स्पर्धा परीक्षांना पायाभूत मानून विद्यार्थ्यांनी अभ्यासाची तयारी करावी- सुवर्णशंखकार अशोक काशीद

स्पर्धा परीक्षांना पायाभूत मानून विद्यार्थ्यांनी अभ्यासाची तयारी करावी- सुवर्णशंखकार अशोक काशीद
बीड/प्रतिनिधी
दि. 13 ऑक्टोबर- मानस गुरुकुल येथे शालेय विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी स्पर्धा परीक्षा तज्ञ व सुवर्णशंख या लोकप्रिय कादंबरीचे लेखक अशोक काशीद हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमावेळी गुरुकुलाचे प्रमुख श्री जाधव सर तसेच श्री ठोंबरे सर हे उपस्थित होते. प्रसिद्ध वात्रटिकाकार श्री दादासाहेब सादोळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
बालपणापासूनच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची सवय लावली की मोठेपणी काठीण्य पातळी वाढली तरी स्पर्धा परीक्षांना सहजपणे सामोरे जाता येते असे प्रतिपादन स्पर्धा परीक्षा तज्ञ व सुवर्णशंख या लोकप्रिय कादंबरीचे लेखक श्री अशोक काशीद यांनी केले. उपस्थित विद्यार्थ्यांना शालेय स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम, अभ्यास करण्याची पद्धत, मराठी,इंग्रजी व सामान्य ज्ञान तसेच गणित व बुद्धिमत्ता या विषयांचा अभ्यास कसा करावा यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षेतील समस्या जाणून घेऊन त्यांच्याशी प्रश्नउत्तर स्वरूपात संवाद साधण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे कार्यक्रम उत्साहात पार पडला.








