भारतीय जनता पार्टीचे बीड शहर अध्यक्ष भगिरत बियाणी यांची आत्महत्या

भारतीय जनता पार्टीचे बीड शहर अध्यक्ष भगिरत बियाणी यांची आत्महत्या
बीड/वार्ताहर
भारतीय जनता पार्टीचे बीड शहर अध्यक्ष भगिरत बियाणी यांनी मंगळवार दि. 11 रोजी सकाळी आपल्या राहत्या घरातील बेडरूम मध्ये स्वतःच्या रिव्हालवर मधून गोळी झाडून आत्महत्त्या केली.
या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली. घटनेची माहिती कळाल्या नंतर जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी जमा झाली होती. बियाणी यांनी आत्महत्त्या करण्या मागचे कारण स्पष्ट झाले नाही.
त्यांनी सकाळी आत्महत्या केली. गोळी झाडून घेत त्यांनी स्वतःला संपवले. मात्र, या आत्महत्येचे नेमके कारण समोर आले नाही. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना शहरातील फिनिक्स रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. बियाणी यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. भगीरथ बियाणी यांच्या आत्महत्येची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरली. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे भगीरथ बियाणी नेहमी हसतखेळत कर्तृत्व निभावणारे व्यक्तीमत्व म्हणून पाहिले जाते. या दुर्देवी घटनेने बीड शहरमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
सध्या बियाणी यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे. या ठिकाणी नातेवाईकांसह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्यने गर्दी केली आहे. पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार, उपअधीक्षक संतोष वाळके यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सतीश वाघ, शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक केतन राठोड यांनी धाव घेतली आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.भगीरथ बियाणी यांनी सकाळी आत्महत्या केली. त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतल्याचे समजताच अनेकांना धक्का बसला. त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहिली. बियाणी यांचे गोपीनाथ मुंडे यांच्यासोबतचे फोटो आणि विविध कार्यक्रमामधील फोटो फेसबुक, ट्विटर आणि सोशल मीडियावर शेअर केले. व्हॉटस्अप ग्रुपवरही बियाणी यांचे फोटो शेअर करण्यात आले. पत्रकार, व्यापारी, महसूल, पोलीस अधिकारी तसेच राजकीय क्षेत्रात सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध असणारे भगीरथ बियाणी हे सामाजिक क्षेत्रात देखील अग्रेसर होते. स्व गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ते भाजपमध्ये गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत होते.








