शासकीय निवासी शाळेच्या मुलींची खो-खो जिल्हा अजिंक्यपद चाचणी साठी निवड
Beed

शासकीय निवासी शाळेच्या मुलींची खो-खो जिल्हा अजिंक्यपद चाचणी साठी निवड
पाटोदा/वार्ताहर
पाटोदा तालुक्यातील शासकीय निवासी शाळेच्या मुलींची दिनांक 8/10/ 2022 रोजी बीड जिल्हा खो-खो असोसिएशन व साई गणेश क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित किशोर/किशोरी व महिला/पुरुष जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी मध्ये पाटोदा शासकीय निवासी शाळातील पाच मुलींची निवड झाली यामध्ये सुजाता लोखंडे.(इ.६वी), भारती यादव.(इ.७वी), साक्षी वनवे. (इ.९वी),राजनंदिनी शिंदे.(इ.10 वी), प्रांजली पवळ 10 वीह्या मुलींची निवड झाली असून वाटचाली साठी निवासी शाळेचे मुख्याध्यापक श्री तांबे एस बी,मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती जोगी आर आर,तांदळे मँडम यांच्या सह सर्व शिक्षक सहकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .








