महाराष्ट्र राज्य बालकामगार प्रथा विरोधी नेटवर्क स्थापन

Beed

महाराष्ट्र राज्य बालकामगार प्रथा विरोधी नेटवर्क स्थापन

बालकामगार निर्मुलन नेटवर्कच्या बीड जिल्हा समन्वयक पदी श्री बाजीराव ढाकणे व ओमप्रकाश गिरी यांची निवड

बीड/वार्ताहर 

महाराष्ट्रात बालकामगार , बालविवाह आणि बालमजुरी विषयावर काम करणाऱ्या  बीड सह १२ जिल्ह्यातील ५५ स्वयंसेवी संस्था एकत्र आल्या. बीड जिल्ह्यातील श्री तुळजाभवानी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जोला पो देवगाव ता केज जि बीड यासह संस्थांनी एकत्र येऊन राज्यस्तरीय नेटवर्क स्थापन केले. अपेक्षा होम सोसायटी चे मधुकर गुंबळे यांनी या बैठकीचे नियोजन केले होते. माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. तेलंगणा येथील बालमजुरी विरोधात काम करणाऱ्या एम व्ही फौंडेशन चे व्यंकट रेड्डी व माजी मंत्री तथा आमदार बच्चु भाऊ कडु, हेरंब कुलकर्णी यावेळी आवर्जून उपस्थित होते. महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात या नेटवर्क च्या शाखा स्थापन करण्यात येणार असून बालमजुरी, शाळाबाह्य मुले बालविवाह या विषयावर काम केले जाणार आहे.
शासनाने २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.संदर्भात आवाज उठविण्यात येणार आहे. बालकामगार प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करणे किंवा पर्यायी व्यवस्था निर्माण करण्या संदर्भात मागणी करणे. बालकामगारांची शासकिय आकडेवारीतील तफावत या साठी कायदेशीर मार्गाने लढा देणे ,ऊसतोड कामगारांच्या पाल्यासाठी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाच्या माध्यमातून सुरू करण्यात येत असलेल्या संत भगवान बाबा निवासी वस्तीगृह योजना  अंमलबजावणी बाबत आवाज ऊठवणे या बाबतीत ठराव झाले.राज्यातील बीड सह १२ जिल्ह्यातील समन्वयकांची निवड करण्यात आली. बीड जिल्हा समन्वयक पदी श्री बाजीराव ढाकणे आणि ओमप्रकाश गिरी यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत तसेच मधुकर गुंबळे यांची राज्य निमंत्रक म्हणून निवड झाली.या विषयावर महाराष्ट्र राज्यातील ज्यांना काम करायचे आहे त्यांनी जरूर हेरंब दादा कुलकर्णी 8208589195 या whatsapp वर माहिती द्यावी स्वतः चे संपूर्ण नाव तालुका जिल्हा संस्था असेल तर संस्थेचे नाव संस्था नसेल तर व्यवसाय इत्यादी माहिती द्यावी. 
अमरावती येथे बालमजुरी मुक्त संदर्भात परिषदेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत कुलकर्णी, हेमांगीताई जोशी, जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ हेरंब दादा कुलकर्णी, दीनानाथ वाघमारे,शांतीवनचे दिपक नागरगोजे,किशोर मोघे, महेश पवार,मुकुंद आडेवार , Oxfam india बीड जिल्हा कार्यक्रम अधिकारी ओमप्रकाश गिरी, कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती महाराष्ट्र राज्याचे बीड जिल्हा समन्वयक  बाजीराव ढाकणे , मनोज देशमुख व संजीव भारती, तसेच नितेश बनसोडे, तुषार हांडे किशोर चौधरी, महेश सूर्यवंशी, अतुल मदावार यासह अनेक महत्वाचे कार्यकर्ते उपस्थित होते. बीड जिल्हा समन्वयक पदी श्री बाजीराव ढाकणे आणि ओमप्रकाश गिरी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. आणि शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Sharing

Visitor Counter