येळंब घाट-कळसंबर रस्त्यावरील पुलाची दुरूस्ती करावी ; अशोक काळकुटे यांची पालकमंत्र्यांकडे मागणी

येळंब घाट-कळसंबर रस्त्यावरील पुलाची दुरूस्ती करावी ; अशोक काळकुटे यांची पालकमंत्र्यांकडे मागणी
बीड/प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यात येणाऱ्या येळंब (घाट) ते कळसंबर या रस्त्यारील पुल गेल्या ४ वर्षांपासून खराब झालेला आहे. गेल्या वर्षीच्या पावसात तो वाहुन गेला असुन तब्बल १३ गावातील लोकांची दररोज हेळसांड होत आहे. तर शेकडो विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी येळंब (घाट) शिवाय शाळा नसल्याने त्यांचेही शैक्षणिक नुकसान होत आहे. वारंवार कळवुनही स्थानिक प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप राष्ट्रीय छावा संघटनेचे युवा अध्यक्ष काळकुटे यांनी निवेदनाद्वारे काल दि.६ ऑक्टोबर २०२२ रोजी केला आहे.
या पुलासह रस्त्याची दुरावस्था झाली आहे. तरी पालकमंत्र्यांनी १३ गावातील गावकऱ्यांच्या या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन या संदर्भात तात्काळ संबंधित प्रशासनाला सुचना देऊन प्रश्न सोडवावा अशी विनंती या निवेदनाद्वारे पालकमंत्री ना.अतुल सावे यांच्याकडे राष्ट्रीय छावा संघटनेचे अध्यक्ष गंगाधर नाना काळकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा अध्यक्ष अशोक काळकुटे यांनी केली आहे.
सावे साहेब प्रश्न नक्कीच सोडवतील छावा चा असा विश्वास.
हा प्रश्न गेल्या चार वर्षांपासून जशाचा तसा आहे. रस्त्याची देखील मोठी दूरावस्था झालेली आहे. तरी या संदर्भात नूतन पालकमंत्री अतुलजी सावे हे प्रश्न नक्कीच सोडवतील असा विश्वास राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे ना.अतुल सावे हा प्रश्न कधी मार्गी लावतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.








