आ. संदीप क्षीरसागर यांच्या हस्ते श्री खंडेश्वरी देवीची आरती संपन्न

आ. संदीप क्षीरसागर यांच्या हस्ते श्री खंडेश्वरी देवीची आरती संपन्न
बीड/प्रतिनिधी
संपुर्ण बीड शहरातील व परिसरातील भाविक भक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री खंडेश्वरी देवीची सोमवार (दि. ४)रोजी सायंकाळी आ.संदीप क्षीरसागर यांनी मनोभावे पूजा व आरती करून आशिर्वाद घेतले वयावेळी शक्तीची देवता आपण सर्वांना सुख, समृद्धी, यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो अशी प्रार्थना केली. दोन वर्षांनंतर भाविकांना व शहरवासियांना श्री. खंडेश्वरी देवीची यात्रा पाहण्यास मिळत आहे. लहान मुलांच्या आवडीचे विविध प्रकारचे खेळ, महिलांसह भाविकांची प्रचंड गर्दी, छोट छोटे व्यवसाय करणारे व्यापारी,मोठं मोठे राहटपाळणे पाहून मन अगदी आनंदमय होऊन जाते. आनंदमय वातावरणात श्री. खंडेश्वरी देवी ट्रस्टचे अध्यक्ष, मंदिराचे सदस्य यांच्यासह पोलीस बांधव मंदिर परिसरात भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी जातीने लक्ष ठेऊन आहेत. याबद्दल आ.संदीप क्षीरसागर यांनी सर्वांचे आभार मानले.








