कवी प्रेम पवळ यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर

Ashti

कवी प्रेम पवळ यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर

प्रतिनिधी/आष्टी 

तालुक्यातील सुलेमान देवळा येथील सर्वसामांन्य कुटुंबातील रहवाशी असुन व्यवसाय करुन आपला छंद जोपासता येतो हे प्रेम कवींनी समाजाला दाखवुन दिलं... 
प्रितम सोन्याबापू पवळ अर्थातच महाराष्ट्राचे लाडके प्रेम कवी यांची साहित्य क्षेत्रातील उंच भरारी दिवसेंदिवस दिवस जोर धरतं आहे. महाराष्ट्राचा काव्यसम्राट, समाजरत्न, समाज भुषण अशा विविध आता पर्यंत 12 राज्यस्तरीय पुरस्कार आणि 1 गोल्ड मेडल प्राप्त आणि आता पर्यंत ४३६७ कविता लिहुन त्यांनी वेगळ्या प्रकारचा विक्रमच नोंदवला आहे ते कविता बरोबरच एक उत्तम वात्रटिका आणि प्रतिनिधी म्हणून पाच ते सहा दैनिकला काम ही करतात स्वतःचे स्वलिखीत चार काव्यसंग्रह जणू तरुण पिढीला खाऱ्या प्रेमाचे धडे देत असतात आज तर या प्रेम कवींनी तर महाराष्ट्राबाहेर ही बीड जिल्हाची मान उंचावली आता तर बेटी फाऊंडेशन (विर्दभ) यांच्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणारा आंतरराष्ट्रीय चषक पुरस्कार पटकावला असुन  पंचक्रोशीतुन नव्हे तर संपूर्ण राज्यातुन त्यांच्यावर कौतुकास्पद शुभेच्छाचा वर्षाव होतं आहे.

Sharing

Visitor Counter