डॉ जयश्री किरण जाधव यांनी एमडीएस ची पहीली पदवी केली संपादन

डॉ जयश्री किरण जाधव यांनी एमडीएस ची पहीली पदवी केली संपादन
गेवराई प्रतिनिधी
गेवराई तालुक्यातील वावरे अंतरवाली येथील सौ डाॅ जयश्री किरण जाधव यांनी MDS ची पदवी संपादन केली आहे विशेष म्हणजे त्या गेवराई तालुक्यातून प्रथम महिला एमडीएस पदवीधारक ठरल्या आहेत त्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक अभिनंदन होत आहे
गेवराई तालुक्यातील वावरे अंतरवालीच्या सुन डाॅ जयश्री किरण जाधव यांनी Oral & Maxillofacial Surgery मध्ये MDS केले आहे व त्या गेवराई तालुक्यातील पहिल्या Oral & Maxillofacial Surgeon आहेत. त्यानी नागपुर ला बीडीएस आणि एमडीएस चे शिक्षण अमरावतीला केले.
डाॅ जयश्री ह्या डाॅ किरण जाधव यांच्या पत्नी व श्री लहुराव जनार्धनराव जाधव यांची सुन आहेत डाॅ सौ जयश्री जाधव ह्या नेहमीच गेवराईतील जनतेला वैद्यकीय सेवा देण्यासाठी तत्पर असल्याने व एमडीएसची पदवी प्राप्त केल्याबद्दल गेवराई तालुक्याचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित साहेब, तसेच बीड जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विजयसिंह राजे पंडित, यांच्या सह अमृत डावकर सर,घाडगे सर, पंडित सर,जाधव सर, आदींनी अभिनंदन व कौतुक केले आहे








