गुजराती समाजाचे नवरात्री महोत्सवाचे उत्साहात आयोजन

Beed

गुजराती समाजाचे नवरात्री महोत्सवाचे उत्साहात आयोजन

बीड/वार्ताहर 

        कोरोना संकट ओसरल्यानंतर या वर्ष सर्व सण उत्साहात साजरे केले जात आहेत नवरात्री चा सण आला असल्याने गुजराती बांधवानी जय्यत तयारी केली आहे. गुजराती समाज गेल्या 50 वर्षपासुन देवीची स्थापना करून नवरात्र महोत्सव साजरा करत आहेत. प्रथम धोंडीपुरा येथील ठक्कर बिल्डिंग मध्ये नवरात्र उत्सवाची सुरुवात झाली .व गेल्या 15 वर्षांपासून श्री जलाराम मंदिर , गुजराती कॉलोनी येथे स्थापना करण्यात येत आहे. नवरात्र उत्सवाच्या पाहिल्या अध्यक्ष पदाचा मान ज्येष्ठ स्वातंत्रयसैनिक स्व. अमृतलाल नरभेराम बुद्धदेव यांनी भूषवला होता. देवीची स्थापना करून नऊ दिवस रास गरबा ,दांडिया रास नृत्य करून देवीची आराधना केली जाते. दुर्गाष्टमीच्या दिवशी मंत्रोच्चारात महायज्ञ करून पूर्णाहुती दिली जाते, तसेच द्वादशी चे दिवशी ब्राम्हण भोजनाचे आयोजन केले जाते.

नवरात्र महोत्सव म्हटले की डोळ्यासमोर येतो तो गुजराती बांधवांचा रंगीबेरंगी पारंपारिक पोशाख, उत्साहाने भरलेले नऊ दिवस. गुजराती समाज हा गरबा आणि दांडिया खेळन्यापुरता उत्सुक नसतो तर पारंपारिक पद्धतीने सण साजरा करण्या साठी आग्रही असतो , एरवी पाश्चिमात्य पोषाखाकडे झुकलेली नवीन पिढी मोठ्या हौसेने पारंपारिक वेशभूषा नेसुन रास गरबा व दांडिया चा आनंद उपभोगत असतात.

यंदा दिनांक 26 सप्टेंबर पासून नवरात्र उत्सवाची सुरुवात होत आहे. सालाबाद प्रमाणे याही वर्षी षष्ठी आणि सप्तमी च्या दिवशी महिला आणि बालगोपाल मंडळींसाठी रास गरबा आणि दांडिया स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन गुजराती समाजाचे अध्यक्ष श्री. अतुल संघांनी आणि सचिव श्री. दीपक शहा यांनी केले आहे.

 

Sharing

Visitor Counter