पाटोदा नगरपंचायत नगरविकास आराखडा दुरूस्तीसाठी लक्ष्यवेधी धरणे आंदोलन

पाटोदा नगरपंचायत नगरविकास आराखडा दुरूस्तीसाठी लक्ष्यवेधी धरणे आंदोलन ; पाटोदा -चुंबळी पाणंद रस्ता अतिक्रमण प्रकरण-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
बीड/वार्ताहर
पाटोदा नगर पंचायत कार्यालयामार्फत राबविण्यात आलेला नगरविकास आराखडा (डी.पी.प्लान. )मधील पाटोदा-चुंबळी रस्ता न दर्शविता जाणीवपुर्वक चुकीचा प्लान तयार करणा-या संबधितांवर गुन्हे दाखल करून त्या मार्गावरील अतिक्रमण काढण्यात येऊन रस्ता खुला करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.२२ सप्टेंबर २०२२ वार गुरूवार रोजी नगरपंचायत पाटोदा कार्यालयासमोर लक्ष्यवेधी धरणे आंदोलन करण्यात येऊन निवेदन मुख्याधिकारी नगरपंचायत पाटोदा ढाकणे यांना देण्यात आले. आंदोलनात पाटोदा भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष हमीदखान पठाण,तोसिफ हमीद,ताहेर हसन बिस्किट्स,अनिकेत राख,दादासाहेब राख,अमोल नाईकनवरे,बाळासाहेब सानप,उद्धव राख,विशाल शेवाळे,आनंद जादव,सोमनाथ मुळे,मनोज पांडव,सागर वाघ,शेख जुनेद,आदि सहभागी झाले होते.
सविस्तर माहीतीस्तव-
पाटोदा नगरपंचायत कार्यालयामार्फत दि.२३ मे २०२२ रोजी सादर नगरविकास आराखडय़ात (डी.पी. प्लान)जुना पाटोदा ते चुंबळी हा रस्ता ३३ फुट रूंद असुन तो पाटोदा येथुन सुरू होऊन चुंबळी गावापर्यंत जातो परंतु तो जुना रस्ता नगरपंचायत कार्यालयामार्फत नगरविकास आराखडय़ात दाखवण्यात आला नसुन डी.पी.प्लान जाणीवपुर्वक चुकीचा बनवण्यात आला असून त्यामध्ये सर्वे नंबर ७४०, ७४१ , ७४२ च्या पुर्वेला असणारा पाटोदा -चुंबळी रस्ता दाखवण्यात आला नाही.पाटोदा
नगरपंचायत कार्यालयामार्फत राबविण्यात आलेल्या नगरविकास आराखडय़ात त्या जुन्या पाटोदा-चुंबळी पाणंद रस्त्याचा उल्लेख न करता फक्त राज्य महामार्ग ५४८ -डी या रस्त्याचा उल्लेख आहे. वास्तविक सदर राज्य महामार्ग ५४८ -डी व जुना पाटोदा-चुंबळी पाणंद रस्ता यांचा एकमेकाशी काहीही संबंध नसुन सदरील दोन रस्ते वेगवेगळे आहेत. त्यामुळेच याठिकाणी
शहराच्या विकास कामात अडथळा ठरणार असुन याठिकाणी मोठ्याप्रमाणात अतिक्रमण करण्यात आले असून मुळ जागा मालकांवर अन्याय करण्यात आलेला आहे. त्यामुळेच तात्काळ अतिक्रमण काढण्यात येऊन चुकीचा नगरविकास आराखडा बनविणा-या जबाबदार आधिका-यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री,प्रधान सचिव,नगरविकास मंत्री,विभागीय आयुक्त यांना करण्यात आली आहे.
२ ऑक्टोबर गांधी जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन :-डाॅ.गणेश ढवळे
नगरपंचायत कार्यालयामार्फत नगरविकास आराखडय़ात जाणीवपुर्वक चुका करणा-या संबधितांवर ठोस कारवाई न झाल्यास दि.०२ रोजी ऑक्टोबर गांधी जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर "सत्याग्रह आंदोलन "करण्यात येणार आहे.








