स्वत:ची क्षमता ओळखून महिलांनी स्वयंपूर्ण व्हावे – प्राजक्ता धस

Beed

स्वत:ची क्षमता ओळखून महिलांनी स्वयंपूर्ण व्हावे – प्राजक्ता धस

आष्टीत माई राज्यस्तरीय पुरस्काराने विविध क्षेत्रातील महिलांना सन्मानित,

सृष्टी बहूउद्देशीय सेवा भावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम 

आष्टी/वार्ताहर 

आजच्या युगातील स्त्री सर्व पातळ्यांवर आघाडीवर आहे. परंतु आजही अनेक स्त्रीयांना स्वत:च्या सामर्थ्याची जाणीव झालेली नाही. त्या स्त्रीयांनी स्वत:चे सामर्थ्य ओळखून स्वयंपूर्ण होणे गरजेचे आहे. स्त्री या दूध व्यवसायात सक्षम आहेच परंतु स्वत:मधील क्षमता ओळखून तीने स्वयंपूर्ण व्हायला हवे, असे प्रतिपादन मुंबई महानंदच्या संचालिका प्राजक्ता सुरेश धस यांनी केले.

सृष्टी सेवा भावी संस्थेच्या वतीने आष्टी येथील जोगेश्वरी मंगल कार्यालय येथे शनिवार दि १७ सप्टेंबर रोजी आयोजित माई राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान समारंभात त्या बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून तेजस्वीनी महिला विकास संस्थेच्या अध्यक्षा संगिता शिंदे, नगराध्यक्षा पल्लवी धोंडे, अयोध्या हंबर्डे, प्राचार्या प्रिती पटवारी, सामाजिक कार्यकर्ती आरती बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते. 

धस पुढे म्हणाल्या, महिला मुळातच सक्षम असते. कोणतेही आव्हानात्मक काम तीने मनावर घेतल्यास ते काम ती सहज पूर्ण करु शकते.सकारात्मक पणे काम करायला हवे, स्त्रीला यशस्वी होण्याच्या वाटचालीत मदत करणाऱ्या पुरुषाचाही हात आहे, तसेच महिलांनी स्वतः विविध क्षेत्रात काम करायला हवे जेणेकरून संसार करून स्वावलंबी व्हायला हव्यात आज या सर्व विविध क्षेत्रांतील महिलांचा सृष्टी सेवा भावी संस्थेने पुरस्कार देऊन सन्मान केला या संस्थेचे कौतुक करायला हवे असेही त्या यावेळी म्हणाल्या.याक्रमाचे आयोजन सृष्टी बहूउद्देशीय सेवा भावी संस्थेच्या अध्यक्षा मिनाक्षी विकास डोंगरे, उपाध्यक्षा माधुरी प्रविण साळवे, सचिव भारती अशोक एकलारे,स्नेहल हंबर्डे

 स्वरांना पाटेकर, मनिषा पोतदार यांनी केले होते.याक्रमाचे सुत्रसंचलन शिक्षक बाळासाहेब तळेकर तर आभार मिनाक्षी डोंगरे यांनी मानले.

माई राज्यस्तरीय पुरस्काराने या महिलांना गौरविण्यात आले 

शिक्षिका वर्षा जाधव, परिचारिका बी शेख, संस्कृती विद्यामंदिर संचालिका शितल तांगडे, मंडळ अधिकारी सोनाली कदम, झुंझार नारी मंच अध्यक्षा मनीषा चवरे, पोलिस शिपाई स्वाती मुंडे, महिला सक्षमीकरण आशा साळवे, सरपंच अदिका लोखंडे,ग्रामसेविका निशा आदक,अॅबेक्स कोचींग संचालिका वंदना वांढरे,मयूरी टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स संचालिका अयोध्या हंबर्डे,माजी नगरसेविका वैशाली निकाळजे,बस वाहक आकांक्षा सावंत,शिक्षिका पठाण शमीमबानो,गृहणी भाग्यश्री भिमराव गुरव,निर्मला कानगुडे,श्रीकवर मुथ्था, परिचारिका ए बी शेख,छाया केकान,अश्विनी झूजारे,प्रिती काळे, मनिषा जमदाडे आदी विविध क्षेत्रातील महिलांना सन्मानित करण्यात आले.

Sharing

Visitor Counter