रोटरी क्लबच्या रक्तदान शिबीरास उत्स्फु र्त प्रतिसाद
Beed

रोटरी क्लबच्या रक्तदान शिबीरास उत्स्फु र्त प्रतिसाद
बीड/प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ बीड व तेरापंथ युवक परिषदेच्या वतीने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यास रक्तदात्यांनी उस्फु र्त प्रतिसाद दिला.
रोटरी क्लब ऑफ बीड व तेरापंथ युवक परिषदेच्या संयुक्त विद्यमाने शहरातील गुजराथी कॉलनी येथे असलेल्या तेरापंथ भवन येथे शनिवारी सकाळी रक्तदान शिबीराचे उद्घाटन रोटरी क्लबचे अध्यक्ष कल्याण कुलकर्णी, दिपेश समदरिया व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर रक्तदानास सुरुवात झाली. या शिबीरात दिवसभरात 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी रोटरी क्लब ऑफ बीडचे सदस्य, तेरापंथ युवक परिषदेचे सदस्य तसेच शहरातील प्रतिष्ठीत नागरिकांची उपस्थिती होती.








