वाहन संगणकीय प्रणाली वाहनांची माहिती अद्ययावात करण्याचे

वाहन संगणकीय प्रणाली वाहनांची माहिती अद्ययावात करण्याचे
बीड उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे आवाहन
बीड/वार्ताहर
बीड जिल्हा कार्यक्षेत्रात असणाऱ्या ज्या वाहनांचे अभिलेखे अद्याप पर्यंत संगणकीय वाहन प्रणाली 4.0 वर अद्ययावत करण्यात आलेले नाही किंवा दिसून येत नाही. अशा वाहनांचा बॅकलॉग (डेटा एन्ट्री) संगणकीय प्रणालीवर घेण्याकरिता माहे सप्टेंबर 2022 पासून प्रत्येक महिन्याच्या दिनांक 1 ते 10 या कालावधीत खाली दिलेली कागदपत्रे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सादर करण्यात यावे.
वाहनाचे मूळ नोंदणी पुस्तक, वाहनाचा कर भरणा केल्याची पावती, वाहन खरेदी केल्याचा पुरावा, वाहन मालकाचे शपथपत्र, वैध विमा प्रमाणपत्र, वैद्य पीयूसी इ. कागदपत्रे कार्यालयात जमा केल्यानंतर सदरील कागदपत्रांची सत्यता पडताळणी प्रत्येक महिन्याच्या दिनांक 11 ते 20 या कालावधीत करण्यात येईल. कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर ज्या वाहनाचे कागदपत्रांमध्ये कोणतेही त्रुटी आढळून येणार नाही अशा वाहनांची तपासणी किंवा निहाय मोटार वाहन निरीक्षक यांच्याकडून करण्यात येईल. यादी प्रसिद्ध करून तर नंतर मोटार वाहन निरीक्षक यांची तपासणी अहवाल यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाल्यास वाहनाच्या सत्यतेची खात्री झाल्यानंतर सदरील वाहनांचे (डेटा एन्ट्री) संगणकीय प्रणाली वर वाहन 4.0 वर घेण्यात येईल, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बीड यांनी कळविले आहे








