गणेशोत्सव सामाजिक उपक्रमाने साजरा व्हावा - राहुल मोरे

गणेशोत्सव सामाजिक उपक्रमाने साजरा व्हावा - राहुल मोरे
बीड/प्रतिनिधी
आज पासून गणेश उत्सवाला मोठ्या उत्साहात निर्बंध मुक्त सुरुवात झाली असून सजग युवा वर्गांनी हा उत्सव आरोग्य,शिक्षण,पर्यावरण,उद्योग,
रोजगार,निसर्ग,भेडसावणाऱ्या समस्यांवर उपाय व मार्गदर्शन, प्रदूषण,मदत,तंत्रज्ञान,समाज उपयोगी शिबिरे याबरोबरच इतर विषयावर जागृती करत आपली युवा शक्ती-कौशल्याचा सुयोग्य उपयोग करत विविध सामाजिक उपक्रमाने आदर्श गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन श्री.राहुल मोरे यांनी केले आहे.
या वर्षीचा उत्सव पर्यावरण पूरक, पर्यावरणस्नेही असावा.सकल कलाचा अधिपती बुद्धीदाता मंगलमूर्ती गणरायाचे आगमन आज सार्वजनिक गणेश मंडळासह सर्वांच्या घरी झाले.राष्ट्रभक्ती तसेच राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत व्हावी, म्हणून सार्वजनिक उत्सवाची सुरुवात झाली होती. कालांतराने या उत्सवाची व्यापकता वाढत जाऊन आता हा उत्सव राज्य,राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या उत्साहात साजरा होतो.आपल्या भारतीय सण, उत्सवाला अनन्य साधारण महत्त्व असून त्याची व्याप्ती मोठी आहे. गेली दोन वर्ष कोरोना संसर्गामुळे मर्यादा सण-उत्सव साजरा करण्यासाठी आल्या होत्या, मात्र यावर्षी निर्बंध शिथिल झाले आहेत. म्हणून हा उत्सव मंगलमय वातावरणात पुढील दहा दिवस साजरा होताना दिसणार आहे. सार्वजनिक मंडळांनी हा उत्सव युवा वर्गाबरोबरच,दैनंदिन सामाजिक समस्याच्या निराकारणासाठी योग्य उपाययोजना करून व्याख्याने, मार्गदर्शक, शिबिरे,निसर्गाचे वेळीच महत्त्व जाणून जनजागृती करणे, गरजेनुसार खर्च करत, व्यर्थ होणारा खर्च टाळत सामाजिक बांधिलकी जोपासवी. निराधार,वंचितांताना मदत करत नवा आदर्श समाजापुढे ठेवावा,काही मंडळे हे करतातही याला आता चालना मिळण्याची गरज असून समाज हित लक्षात घेऊन, " एक मदत समाजासाठी, सर्वांच्या सर्वांगीण विकासासाठी असावी " असे आव्हानही त्यांनी केले आहे.








