कोरोनाने मयत अनुदान वाटपात घोळ काहींना दोनदा अनुदान तर लाभार्थी वंचित चौकशी करून कारवाईची मागणी-डाॅ.गणेश ढवळे 

Beed

कोरोनाने मयत अनुदान वाटपात घोळ काहींना दोनदा अनुदान तर लाभार्थी वंचित चौकशी करून कारवाईची मागणी-डाॅ.गणेश ढवळे 

बीड/वार्ताहर 

कोरोनामुळे मयत व्यक्तिंच्या कुटुंबियास प्रति ५० हजार रूपयांचे सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले राज्यातील २०५३ जणांच्या बॅक खात्यावर जवळपास १० कोटी २६ लाख रूपयांची अतिरिक्त रक्कम जमा झाल्याचे निदर्शनास आले असून दोनदा अनुदान वाटप करण्यात आल्याचे तर खरे लाभार्थी अनुदानापासुन वंचित असल्याचे आढळून आले आहे त्यामुळेच संबधित प्रकरणात उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी आणि लाभार्थींना तात्त्काळ अनुदान वाटप करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी बीड,जिल्हा आपत्तीव्यवस्थान प्राधिकरण आधिकारी बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री,प्रधान सचिव,उपसचिव संजय धारूरकर यांना केली आहे. 

 

सविस्तर माहीतीस्तव:-

कोरोना आजारामुळे मयत झालेल्या व्यक्तिच्या नातेवाईकास प्रति ५० हजार रूपये सानुग्रह अनुदान देण्यात येते. राज्यभरात २६ नोव्हेंबर २०२१ पासून सुरू झालेल्या योजनेसाठी संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली असून जिल्हा आपत्तीव्यवस्थान प्राधिकरणाने छाननीअंती मंजूर केलेल्या अर्जदाराच्या बॅक खात्यात हे अनुदान कोटक महेंद्रा बॅक मार्फत थेट जमा करण्यात येते. दरम्यान ज्या अर्जदाराच्या खात्यात सानुग्रह अनुदानाची रक्कम जमा केली आहे त्याची माहिती राज्याचे आपत्ती व्यवस्थापन ,मदत व पुनर्वसन विभागास दिली जाते. त्यामध्ये बीड जिल्ह्य़ातील २९ मयत व्यक्तिच्या नातेवाईकास अथवा अर्जदारास २ वेळेस अथवा एकाच व्यक्तिला एपीबीएस तसेच एनईएफटी द्वारे २ वेळेस सानुग्रह अनुदान सहाय्य दिल्याचे निदर्शनास आले असून संबधित प्रकरणात उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी तसेच खरे वंचित लाभार्थ्यांना तात्काळ सानुग्रह अनुदान वाटप करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. 

 

विकसित संगणक प्रणाली असताना दोनदा अनुदान वाटप संशयास्पद म्हणून सखोल चौकशी गरजेचं:-डाॅ.गणेश ढवळे 

कोरोनामुळे मयत व्यक्तिचे नातेवाईक ऑनलाइन अर्ज करतात,सर्व कागदपत्रे,बॅक खाते,आधार क्रमांक,बॅकेशी आधार लिंक मोबाईल नंबर दिला जातो मग एवढी सगळी सक्षम संगणक प्रणाली असतानाही दोनदा अनुदान वाटप करण्यात येते हे संशयास्पद असुन सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. 

Sharing

Visitor Counter