फुरखान खान बी-टेक सिविल परीक्षेत विशेष प्राविण्‍याने उत्तीर्ण 

Beed

फुरखान खान बी-टेक सिविल परीक्षेत विशेष प्राविण्‍याने उत्तीर्ण 

बीड/प्रतिनिधी

शहरातील शहेनशहा नगर भागातील रहिवाशी तथा बीड नगर परिषद चे माजी नगरसेवक व माजी सभापती शकील खान यांचा मुलगा फुरखान खान बी-टेक सिविल च्या अंतिम वर्षात ८०.२३% गुण घेत औरंगाबाद येथील श्री यश कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मधून विशेष प्राविण्‍याने उत्तीर्ण झाला आहे. त्याच्या या यशाबद्दल शब्बीर खान शिक्षक जिल्हा परिषद, प्राचार्य सिद्दिकी नवीद, डॉक्टर जफर अली, अॅड. मुजफ्फर अली, शेख खालेद, शेख महेमूद, भाऊ पठाण आदिल, इम्रान खान, नातेवाईक, शहेनशहानगर वासियांसह मित्र परिवारातर्फे फुरखान खान वर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्याच्या पुढील आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहे.

 

Sharing

Visitor Counter