मोटरसायकल व स्विफ्ट डिझायरच्या अपघातात महिला जागीच ठार!
Beed

मोटरसायकल व स्विफ्ट डिझायरच्या अपघातात महिला जागीच ठार!
बीड/प्रतिनिधी
भरधाव वेगात येणार्या स्विफ्ट डिझायरच्या धडकेने मोटरसायकल वर बसलेली महिला जागीच ठार झाली तर मुलगा गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली.
कमल साळवे व ऋषिकेश साळवे शनिवारी (दि.६) दुपारी पुण्यावरून येत असताना मांजरसुंबा येथे त्यांच्या दुचाकीला एका भरधाव वेगात असणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने धडक दिली या अपघातात कमल साळवे ही महिला गंभीर रित्या जखमी होऊन जागीच ठार झाली तर मुलगा ऋषिकेश साळवे हा जखमी झाला त्यास उपचारार्थ बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.








