बीडमध्ये आज जागर कवितांच्या कार्यक्रमाचे आयोजन

Beed

बीडमध्ये आज जागर कवितांच्या कार्यक्रमाचे आयोजन

अमृत महोत्सव आद्य कवियत्री महदंबा यांच्या जयंतीनिमित्त उपक्रम

बीड / प्रतिनिधी  

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आद्य कवियत्री महदंबा यांच्या जयंतीनिमित्त जागर आद्य कवियत्री महदंबेचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन येथे शनिवार (दि.२७) रोजी सकाळी ११ वाजता पार पडतो आहे. या कार्यक्रमात कविसंमेलन, मराठी गीत गायन आणि व्याख्यान आदी कार्यक्रम होणार आहेत. महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्याकडून आयोजित करण्यात आलेला आहे. हा कार्यक्रम सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पेतून पार पडणार आहे. सदरील कार्यक्रम हा विनामूल्य असून सर्व रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा भरुभरुन आस्वाद घेण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य सचिव सौरभ विजय, सांस्कृतिक कार्य संचालनालय संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.

    भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आद्य कवियत्री महदंबा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात कवयिञी महदंबा यांच्या जीवनावर जेष्ठ नाटककार तथा साहित्यिक डॉ. सतीश साळुंके यांचे व्याख्यान होणार आहे. तर पत्रकार तथा लेखक सुनिल डोंगरे, कवी इंजि.निळूभाऊ सावरगेकर,कवयिञी डॉ.अनिता शिंदे, कवी प्रा.विठ्ठल जाधव, गायक तथा आकाश जाधव, कवी सचिन सोनवणे, कवी संदीव खुरूद, कवी अक्षयानंद कोकाटे यांचा कवितांचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन समन्वयक मुकूंद धुताडमल यांनी केले आहे. 

Sharing

Visitor Counter