महाकवी वामनदादा कर्डक यांचा अस्तीकलश २७ ऑगस्ट रोजी बीड शहरात येणार

महाकवी वामनदादा कर्डक यांचा अस्तीकलश २७ ऑगस्ट रोजी बीड शहरात येणार
बीड/प्रतिनिधी
महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी वर्षानिमित्त दि.२७ ऑगस्ट रोजी वामनदादा कर्डक यांचा अस्तीकलश बीड शहरात येणार असल्याची माहिती महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी महोत्सव समिती बीडचे अध्यक्ष प्रा.शरद वंजारे दिली आहे.आंबेडकरी चळवळीचे गायक तथा प्रबोधनकार वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त दिनांक २७ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता अभिवादन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. अभिवादन रॅलीमध्ये वामनदादा कर्डक यांचा अस्तीकलश ठेवण्यात येणार आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन असा रॅलीचा मार्ग आहे.त्यानंतर गीत अभिवादन कार्यक्रमात दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत वामनदादांचा अस्तीकलश यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बीड येथे ठेवण्यात येणार आहे.याची सर्व समाज बांधवांनी नोंद घ्यावी असे आवाहन महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी महोत्सव समिती बीडचे अध्यक्ष प्रा.शरद वंजारे,प्रा.डॉ.संजय कांबळे,प्रा. दिपक जमधाडे, कॅप्टन राजाभाऊ आठवले यांनी केले आहे.








