केज तालुक्यातील सोनिजवळा तांबवा विज पुरवठा तात्कळ करण्याची शेकापची मागणी   

Beed

केज तालुक्यातील सोनिजवळा तांबवा विज पुरवठा तात्कळ करण्याची शेकापची मागणी   

केज/वार्ताहर 

केज गावठाण शेतातील व तांबवा , सोनिजवळा या गावाला गेली तीन ते साडे तिन महिन्या पासून विज पुरवठा बंद आहे , महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार असून अधिकार्यांच्या हालगर्जी पनामुळे तीन महिण्या पासुन विज बंद आहे . विज पुरवठा तात्काळ चालु करण्याची मागणी शेकापचे भाई मोहन गुंड यांनी प्रशासनाकडे केली आहे . विज खंडीत आसल्यामुळे सोयाबीन व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शहरातील वीज पुरवठा करण्याकरिता लोकांची समज काढण्यासाठी कमी कॅपिसिटी ट्रान्सफॉर्मर बसून विद्युत वितरण कंपनीकडून शेतकऱ्याची समज काढली आहे , विधुत पंप चलत नसल्यामुळे शेती पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी हावलदिल झाला असून हातात तोंडाला आलेले पीक वाळून चालले आहेत . शेती पिकाचे नुकसान झाल्यास सर्वस्वी जबाबदारी महावितरण धरुन शेतकऱ्यासह शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने धारूर चौकात विद्युत महावितरण च्या विरोधात रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल . अशा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई मोहन यांनी दिला आहे .

Sharing

Visitor Counter