परळी तालुक्यातील चार वर्षीय चिमुकीलीचा पाण्यात बुडून मृत्यु

परळी तालुक्यातील चार वर्षीय चिमुकीलीचा पाण्यात बुडून मृत्यु
परळी/वार्ताहर
परळी तालुक्यातील अतिशय हृदयद्रावक अशा प्रकारची घटना आज सकाळच्या सुमारास परळी रस्त्यावरील औष्णिक विद्यूत केंद्राचे राख साठवणूक तळे आहे त्याठिकाणी घडली . या ठिकाणी साचलेल्या पाण्याच्या एका डबक्यात पडून चार वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला . राखेच्या तळ्यापासून केवळ शंभर मीटर अंतरावर राहत असलेल्या पवार कुटुंबातील तीन भावंडे खेळत खेळत राखेच्या तलावात साचलेल्या डबक्याच्या पाण्यात गेले . त्याठिकाणी मयत साक्षी व तिची दुसरी बहिण या पाण्याच्या डबक्यात खेळू लागले . खेळता खेळता ते पाण्यात पडले याच ठिकाणी असलेला त्यांचा सात वर्षाचा मोठा भाऊ याने ती घटना बघितली आणि धावत जाऊन त्याने आपल्या पालकांना ही बाब सांगितली . साक्षीचे वडील घटनास्थळावर येऊन त्यांना पाण्यातून बाहेर काढेपर्यंत चार वर्षाची साक्षी या चिमुरडीचा मृत्यू झाला . एका मुलीला सुखरूप बाहेर काढण्यात त्यांना यश आले . सकाळच्या सुमारास ही मुले खेळत खेळत तळ्यात गेली होती . खेळतानाच दुर्दैवाने या तीन मुलांमधील चार वर्षाची चिमुरडी साक्षी साईनाथ पवार हिचा मृत्यू झाला आहे . या घटनेने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे .








