ईतिहासात प्रथमच जिल्हा रूग्णालयात स्पाईन सर्जरी यशस्वी 

Beed

ईतिहासात प्रथमच जिल्हा रूग्णालयात स्पाईन सर्जरी यशस्वी 

सि.एस .डाॅ.सुरेश साबळे यांच्यासह टिमचे सर्वत्र अभिनंदन  

बीड/वार्ताहर 

डॉक्टर साबळे यांची बदली रद्द करण्यासाठी बीडकर का धावले याचा प्रत्यय आज बीडकरांना पुन्हा आला, किचकट मणक्याच्या आजाराने (स्पाइन सर्जरी) ने गंभीर असलेल्या रुग्णावर डॉक्टर सुरेश साबळे व त्यांच्या सहकारी डॉक्टर टीमने जिल्हा रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली इतिहासात पहिल्यांदाच (स्पाइन सर्जरी) जिल्हा रुग्णालयात करण्यात आली स्पाइन सर्जरीचा खर्च एखाद्या व्यक्तीला खाजगी रुग्णालयात न परवडणारा असतो त्यातच एका गरीब कुटुंबातील व्यक्तीला हा दुर्धर आजार जडला मात्र सर्वसामान्यांसाठी नेहमीच मदतीला धावणारे डॉक्टर सुरेश साबळे यांनी त्यांच्या अथक प्रयत्नाने व त्यांच्या सहकारी डॉक्टरांच्या टीमने जिल्हा रुग्णालयात आज (स्पाइन सर्जरी) पार पाडली.

मागील पंधरवड्यात बीड येथील जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे यांच्या बदलीमुळे सामान्य नागरिक ते राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी बदली रद्द करण्यासाठी रान पेटवले होते नेमके काय कारण असेल याची चर्चा राज्यभर झाली सर्वसामान्य रुग्णासाठी देवदूत बनलेले डॉक्टर साबळे यांनी जिल्हा रुग्णालयातील यंत्रणा सामन्यासाठी कामाला लावलेली आहे याचे प्रत्यय अनेक वेळा सामान्य नागरिकांना पाहण्यास मिळते डॉक्टर साबळे हे किचकट ते किचकट शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालयातच करण्यात भर घालतात यातच येथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णांना चांगली व दर्जेदार सेवा देण्यासाठी ते नेहमीच कटिबद्ध असतात या कारणामुळेच बीड मधील सामान्य नागरिक तथा राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी डॉक्टर साबळे यांची बदली रद्द करण्यासाठी विविध आंदोलने केली याची दखल शासकीय पातळीवर घेत डॉक्टर साबळे यांची बदली रद्द करण्यात आली , बीड मधील एका गरीब व्यक्तीला मणक्याचा दुर्धर आजार जडला खाजगी रुग्णालयात या आजारावर उपचारासाठी साधारणता दोन लाख ते तीन लाखाच्या आसपास रक्कम अदा करावी लागत होती मात्र डॉक्टर सुरेश साबळे यांच्या निदर्शनास ही बाब त्यांचे नातेवाईकांनी आणुन दिली याची तात्काळ दखल घेत डॉक्टर साबळे यांनी संपूर्ण टीम कामाला लावली स्पाईन सर्जरी सारखी अवघड शस्त्रक्रिया खाजगी रुग्णालयात न करता थेट जिल्हा रुग्णालयातच केली गेली यासाठी खाजगी रुग्णालयातील पाच डॉक्टरांची विशेष टीम आमंत्रित करण्यात आली त्यांच्या सहकार्याने व डॉक्टर सुरेश साबळे यांच्या अथक प्रयत्नाने आज जिल्हा रुग्णालयात स्पाईन सर्जरी सारखे दुर्धर आजारावरील शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली रुग्णासाठी देवदूत बनलेले डॉक्टर साबळे यांच्यामुळे एका गरीब कुटुंबातील व्यक्तीला पुन्हा जीवदान मिळाले असल्याची भावना त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली डॉक्टर साबळे यांच्यासाठी बीडकर का रस्त्यावर उतरले याचा प्रत्यय आज पुन्हा बीड करांना आला डॉक्टर सुरेश साबळे यांच्यासह त्यांच्या टीम मधील डाॅ. कट्टे,डाॅ.सोमनाथ वाघमारे (भुल तज्ञ),ईंचारज उबाळे,घुले ब्रदर,जफर भाई,यांनी ही शस्त्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम घेतले अत्यंत किचकट व कनिष्ठ असणारी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालयात पार पडली या कामगिरीचे डॉ.सुरेश साबळे यांच्यासह त्यांच्या टीमचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 

डाॅ.सुरेश साबळे माझ्यासाठी देवदूत ! -रूग्णाची प्रतिक्रिया 

एका गरीब रुग्णाला मणक्याच्या आजाराने त्रस्त केले होते. आणि ऑपरेशन हाच एकमेव पर्याय होता. परंतु मणक्याचे ऑपरेशन म्हणजे खायचे काम नाही. त्या साठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद माझ्या आवक्याबाहेर होती. सगळे मार्ग बंद झाले होते पण मला एक देवदूत भेटला तो देवदूत फक्त भेटलाच नाही तर त्याने माझी त्रासातून मुक्तता केली तो देवदूत म्हणजे बीड जिल्ह्याचे जिल्हाशल्यचिकित्सक डाॅ.सुरेश साबळे यांनी माझ्यावर जिल्हारुग्णालयात शस्त्रक्रिया करून बीडच्या इतिहासात मनाचा तुरा खोवला आहे. अशी किचकट शस्त्रक्रिया आणि तेही शासकीय रुग्णालयात प्रथमच यशस्वीरीत्या पार पाडण्याचा मान मिळवला आहे म्हणूनच डाॅ.सुरेश साबळे हे माझ्यासाठी देव आहेत अशी प्रतिक्रया रूग्णाकडुन दिली जात आहे.

 

डाॅ.सुरेश साबळे यांच्या कार्यकाळात कितीतरी शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालयात प्रथमच!

जिल्हा रूग्णालयात चांगल्यापैकी उपचार केला जात असुन कोणत्याही उपचारासाठी खाजगी रुग्णालयात न जाता थेट जिल्हा रुग्णालयातच उपचारासाठी रूग्णांनी यावे या ब्रीदवाक्यला घेऊन चालणारे बीड जिल्हा शल्यचिकीत्सक डाॅ.सुरेश साबळे यांच्या कार्यकाळात जिल्हा रुग्णालयात किचकट ते अतिकिचकट शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालयात प्रथमच करण्यात येत आहेत याचा फायदा सामान्य नागरिकांना होत आसल्याचा बोलायला हरकत नाही .

 

 

 

 

 

 

 

Sharing

Visitor Counter