किल्ले धारूर शहरातील वैकुंठ भुमीत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त झाडे लावून पर्यावरण दिन साजरा

Beed

किल्ले धारूर शहरातील वैकुंठ भुमीत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त झाडे लावून पर्यावरण दिन साजरा

    किल्लेधारूर/इरफान शेख 

किल्ले धारूर शहरातील सामाजिक संस्था कायाकल्प फाऊंडेशनच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वैकुंठ भुमी वृक्षारोपण करण्यात आले  संस्था गेल्यावर्षीपासुन वैकुंठ भूमी येथे वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन करत आहेत. प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षीही जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वैकुंठ भुमी येथे लिंबाचे झाड लावण्यात आले. याचे स्वरूप शहरात मोठ्या प्रमाणात करण्यात येणार असल्याचे कायाकल्प सदस्यांनी व्यक्त केले तसेच किल्ले धारूर शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालयाचे विद्यार्थी प्रिय आदर्श शिक्षक अशोकजी लोकरे सर यांच्या वाढदिवसानिमित्त तेथेव एक झाड लावून वेगळ्या प्रकारे शुभेच्छा दिल्या. 
यावेळी आदर्श शिक्षक अशोकराव लोकरे कायाकल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष दिनेश कापसे, जलदुत विजय शिनगारे, अलंकार कामाजी, बालाजी सातभाई, प्रकाश तोष्णिवाल, महेश गवळी यांनी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला.

Sharing

Visitor Counter