कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत व्ही व्ही गिरी नॅशनल लेबर इन्स्टिट्यूट, नोएडा दिल्ली येथे पाच दिवसीय राष्ट्रीय पातळीवरिल लिंग, गरिबी आणि रोजगार याविषयावर कार्यशाळा संपन्न

Beed

कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत व्ही व्ही गिरी नॅशनल लेबर इन्स्टिट्यूट, नोएडा दिल्ली येथे पाच दिवसीय राष्ट्रीय पातळीवरिल लिंग, गरिबी आणि रोजगार याविषयावर कार्यशाळा संपन्न

 न्यु दिल्ली/वृत्तसेवा 

कामगार आणि रोजगार मंत्रालयांतर्गत आयोजित पाच दिवसीय राष्ट्रीय पातळीवरिल कार्यशाळा लिंग,गरिबी आणि रोजगार यासंदर्भात व्हि व्हि गिरी नॅशनल इन्स्टिट्यूट नोएडा येथे संपन्न झाली .

या कार्यशाळेत भारतीय जनतेसाठी अतिशय आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू असून लवकरच स्त्री पुरुष समानता, गरिबी आणि रोजगार यासंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार असल्यामुळे विविध राज्यांतील समस्या व त्यावरील उपाय यासंदर्भात महत्त्वाचे मुद्दे एकत्रितपणे मांडले आहेत.

या कार्यशाळेसाठी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व बाजीराव ढाकणे ,बीड जिल्हा समन्वयक, कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती, महाराष्ट्र राज्य ,सरस्वती प्रकाश शिक्षण प्रसारक क्रीडा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था लोणार बुलढाणा चे  अध्यक्ष डॉ. राजकुमार मुंडे, हिंगोली चे आयुब खान, पास्टा श्री भगवान बाबा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जालना चे गजानन डोळे , विशाल उघडे व श्री तुळजाभवानी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जोला ता केज जि बीड यांनी या कार्यशाळेत विविध सामाजिक विषयांवर चर्चा केली तसेच या कार्यशाळेत यशस्वी सहभागी झाल्याबद्दल व्हि व्हि गिरी नॅशनल इन्स्टिट्यूट नोएडा चे महासंचालक श्री अमित निर्मल आणि संचालक डॉ. शशी बाला यांच्या हस्ते कार्यशाळेच्या समारोप समारंभात बाजीराव ढाकणे यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. 

व्हि व्हि गिरी लेबर नॅशनल इन्स्टिट्यूट नोएडा येथे लिंग, गरिबी आणि रोजगार यासंदर्भात कार्यशाळा 8 ते 12 ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये लिंग ,गरीबी आणि बेरोजगारी या विषयावर संपूर्ण देशासमोर असलेल्या समस्या आणि त्यावरील उपाययोजना यासंदर्भात चर्चा झाली. या कार्यशाळा आणि प्रशिक्षणासाठी देश भरातुन 24 प्रतिनिधी सहभागी झाले होते. या कार्यशाळेत सहभागी झालेले सर्व सामाजिक कार्यकर्ते सामाजिक क्षेत्रातील विविध प्रकारच्या समस्या व विषयावर कार्यरत असुन ते हा विषय आपापल्या क्षेत्रात आणि कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांनी यांच्या बरोबर यासंदर्भात महत्त्वाचे मुद्दे एकत्रितपणे मांडलतील असे महासंचालक अमित निर्मल यांनी सांगितले. दिलीपकुमार पासवान, अमृता कुमारी, एनजीओ युनियनचे अध्यक्ष राजीव गौतम, अमित कुमार वर्मा, जिल्हाध्यक्ष शिक्षण समिती जिल्हा परिषद, सत्य प्रकाश कुशवाह, रेल्वे ट्रेड युनियनचे नेते संतोष कुमार निराला यांनी देशातील सर्व चौवीस तरुण सामाजिक कार्यकर्त्यांचे या कार्यशाळेत सहभागी होऊन यशस्वी प्रशिक्षण व सहभाग प्रमाणपत्र दिल्याबद्दल, सचिव डॉ. युवा सौर्य दीपक कुमार, आस वेलफेअर सोसायटीचे सचिव मनीष कुमार, सामाजिक कार्यकर्ते पप्पू कुमार, सल्लागार प्रदीप कुमार, राजेश सोहनी, नवीनकुमार रजक, जयप्रकाश यादव, राजकुमार, मिथिला युवा संघाचे अध्यक्ष अनुष राज, आझाद हिंद युथ क्लबचे अध्यक्ष सहदेव पीपल्स आदी अभिनंदन केले आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच संजयकुमार यांनी ही बाब भारतीय जनतेसाठी आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची असल्याचे म्हटले आहे.

Sharing

Visitor Counter