स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रभाग क्रमांक १२ मधील मंजूर झालेल्या रस्ते व नाल्यांसाठी आमरण उपोषण - शेख मोहसीन

Beed

स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रभाग क्रमांक १२ मधील मंजूर झालेल्या रस्ते व नाल्यांसाठी आमरण उपोषण - शेख मोहसीन

बीड/प्रतिनिधी

शहरातील अहेमदनगर रोडवरील बालेपीर एरियातील प्रभाग क्रमांक १२ मधील रोशनपुरा परिसरातले पाच रस्ते व नाल्यांच्या कामांना वर्षभरापूर्वी मंजुरी मिळूनही प्रत्यक्ष कामास सुरुवात होत नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १५ ऑगस्ट २०२२ रोजी आमरण उपोषण करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते शेख मोहसीन, अल्ताफ शेख, जुनैद खान, सोहिल शेख, अमजद शेख, सरफराज सय्यद आदींनी जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

या विषयी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, बीड शहरातील अहेमदनगर रोडवर असलेल्या प्रभाग क्रमांक १२ मधील रोशनपुरा परिसरात शेख साहेब यांच्या घरापासून गादीवाले यांच्या घरापर्यंत, अजीम भाई यांच्या घरापासून अझहर भाई यांच्या घरापर्यंत, समदानी मामू यांच्या घरापासून ते जब्बार मिस्त्री यांच्या घरापर्यंत, नजीर भाई यांच्या घरापासून ते जमीर मिस्तरी यांच्या घरापर्यंत, हाजी अब्बास भाई यांच्या घरापासून ते बब्बू मिस्त्री यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ते व नाल्यांच्या कामास बीड नगर परिषदेतील सर्वसाधारण सभेत ऑगस्ट २०२१ मध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूरी देण्यात आलेली आहे. ही बाब बीड नगर परिषदेकडून काढण्यात आलेल्या ई-निविदेमध्ये नमूद आहे. परंतु सदरील विकास कामे मंजूर होऊन सुद्धा वर उल्लेख केलेले पाचही रस्ते व नाल्याचे काम एक वर्ष उलटूनही सुरू केले जात नाही. शहरातील इतर भागात रस्ते व नाल्यांचे विकासात्मक कामे सातत्याने करून देण्यात येत आहे परंतु मुस्लिम बहुल असलेल्या प्रभाग क्रमांक १२ मध्ये बीड नगर परिषदेतील सत्ताधारी व राजकारणी जाणून बुजून दुर्लक्ष करत सावत्र वागणूक देत आहेत. यामुळे मुस्लिम बहुल परिसर विकासात्मक कामांपासून कोसो दूर राहत आहे. ही बाब लक्षात घेऊन दिनांक १३ ऑगस्ट २०२१ रोजी बीड नगर परिषद समोर आमरण उपोषण केले होते. या उपोषणावेळी मुख्याधिकारी यांनी लिखित पत्र देऊन प्रभाग क्रमांक १२ मधील सर्व रस्ते व नाल्यांचे काम करण्याकरिता बीड नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव घेतला जाईल व लवकरात लवकर विकास कामांना सुरुवात करण्यात येईल असे लिखित आश्वासन उपोषणावेळी उत्तर पत्रात देऊन उपोषण सोडावयास लावले होते. यानंतर बीड नगर परिषदेत झालेल्या सर्वसाधारण सभेत घेतलेल्या ठरावात वरील सर्व रस्ते व नाल्यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती. याला आता पूर्ण १ वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे. तरीसुद्धा आजपर्यंत या पाचही रस्ते व नाल्यांची कामे सुरू करण्यात आलेली नाहीत. ही कामे लवकरात लवकर सुरू व्हावी तसेच बीड नगर परिषदेकडून होत असलेल्या या कामातील दिरंगाई चा निषेध म्हणून आता आम्ही पुन्हा एकदा येत्या १५ ऑगस्ट २०२२ सोमवार रोजी सकाळी ०७:०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या प्रभागात राहणाऱ्या बहुसंख्य नागरिकांच्या उपस्थितीत आमरण उपोषण करणार आहोत असे जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनातून सामाजिक कार्यकर्ते शेख मोहसीन, अल्ताफ शेख, जुनैद खान, सोहिल शेख, अमजद शेख, सरफराज सय्यद आदींनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. 

Sharing

Visitor Counter