रूग्णवाहीका चालकांचा बेमुदत संप

Beed

रूग्णवाहीका चालकांचा बेमुदत संप

बीड/प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील रुग्णवाहिका आजपासून बंद होणार असल्याची माहिती रुग्णवाहिका संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन सांगितला आहे , मात्र अनेक महिन्यांपासून या रुग्णवाहिकेच्या चालकांचे मानधन दिले नसल्याने रुग्णवाहिका चालकांचे हे मोठे पाऊल बीड जिल्ह्यातील १०२ रुग्णवाहिका आजपासून बंद होणार असल्याचं दिसून आला आहे , यामध्ये रुग्णवाहिका चालकांचे सहा महिन्यांचे पेमेंट झाले नसल्याने वारंवार शासन दरबारी याची , तक्रार देऊन देखील त्यांच्या प्रश्नाकडे कोणी सुद्धा लक्ष दिलं नाही , त्या कारणामुळे हा जिल्हाधिकारी यांना निवेदन देत रुग्णवाहिका चालकांनी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे , मात्र हा संप चालू झाल्यामुळे इतर रुग्णांचे हाल होणार हे मात्र नक्की जोपर्यंत रुग्ण वाहक याचे चालकांचे पेमेंट होणार नाही , तोपर्यंत रुग्णवाहिका रस्त्यावर धावणार नसल्याचे देखील या ठिकाणी रुग्णवाहिका चालकांनी इशारा दिला आहे , आम्ही भर करुणा च्या काळामध्ये स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून , रुग्णसेवा आणि कोरना ग्रस्त लोकांना सेवा दिली आहे , इतर वेळी देखील चोवीस घंटे आम्ही या सेवेत तत्पर राहतो मग आमच्यावर असा अन्याय का असा सवाल देखील या वेळेस रुग्ण चालकांनी पुढे आणला आहे , मात्र आता या रुग्णवाहिका बंद पडल्यानंतर काय होऊ शकतो आणि यामध्ये जर एखादा पेशंट दगावला तर याची सर्वस्व जबाबदारी ही शासन प्रशासनावर असेल असही यावेळेस रुग्णवाहिका चालकांनी बोलताना सांगितला आहे , या वेळी रुग्ण चालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Sharing

Visitor Counter