इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांची अवस्था "ना घर का ना घाट का....?

इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांची अवस्था "ना घर का ना घाट का....?
प्रतिनिधी/सी.एल.झोडपे
खरयं........? आपण बातमीचा आशय वाचून थोडं विचारात पडला असावे,परंतु हि सत्य परिस्थिती आहे.महाराष्ट्र राज्यात हजारोच्या संख्येने इंग्रजी माध्यमाच्या शाळा सरकारी परवानगीने चालत आहेत.त्यात विद्यादानाचे काम करणारे शिक्षक बंधू-भगणी ही तेवढ्याच प्रमाणात तुटपुंज्या पगारात कार्यरत आहेत.....! का? तर आपल्या हातून चांगले विद्यार्थी घडावे सोबतच आपला घर संसार सुरळीतपणे चालावा या करिताच ना ? पण आजची कोरोना व्हायरस ची विषाणूजन्य परिस्थिती ओढवली असतांना पगार ही थकीत ठेवले आहेत अगोदरच तुटपुंज्या पगारात काम करणार्या शिक्षकांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे .या परिस्थितीत संस्थाचालक कसल्याही प्रकारची मदत करत नसल्याचे आढळून आले आहे.अश्या अवस्थेत त्यांनी कोणाकडे मदतीसाठी हात पसरावा हा पण महत्वाचा विषय आहे.संस्थाचालकांना पगाराची मागणी केली तर कोरोनाच्या नावाखाली विषयाला बगल देण्याचा प्रयत्न होत आहे.
या संदर्भातील सर्व पार्श्वभुमी शिक्षण क्षेत्रातील अधिकार्यांना माहिती असतांना हि यावर ठोस अशी पावले उचली जात नाहीत, त्यामुळे शासन दरबारी जाऊन हि आपल्या पदरी निराशच येईल का ? या द्वीधा विचाराने शिक्षक बांधव हतबल झाले आहेत. या प्रकरणी शासनाने ठोस पावले उचलावी आणि शिक्षक बांधवांचा प्रश्न निकाली लावावा अशी मागणी इंग्रजी माध्यमाच्या शिक्षक वर्गात होतांना आढळून येत आहे.








