सासू-सूना भारतीय कुटूंब व्यवस्थेच्या कणखर कणा

Beed

सासू-सूना भारतीय कुटूंब व्यवस्थेच्या कणखर कणा

अादर्श सासू पुरस्कार प्राप्त सरला जहागीरदार यांचे प्रतिपादन

बीड शहरातील जीवन कला मंदिरात आदर्श सासू-सुन पुरस्कार प्रदान सोहळा  

बीड/प्रतिनिधी

 

भारतीय कुटूंब व्यवस्थेत सासू अाणि सून यांचे नाते जर प्रेमाचे असेल तर कुटूंब एकसंघ राहण्यासाठी तो कणखर कणा असतो असे प्रतिपादन अादर्श सासू पुरस्कार प्राप्त सरला जहागिरदार यांनी केले.

बीड शहरातील भाग्यनगरातील जीवनकला मंदिराच्या सभागृहात मंगळवार २ ऑगस्ट २०२२ रोजी सासू-सून मंदिराच्या तेराव्या वर्धापनदिनानिमित्त व यंदाचा अादर्श सासू पुरस्कार सरला जहागिरदार यांना ज्योती शेटे यांच्या हस्ते तर उमा शेटे यांच्या हस्ते पल्लवी जहागिरदार यांना आदर्श सुन पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्मृतिचिन्ह, साडी चाेळी, शाल व पुष्पहार असे पुरस्काराचे स्वरूप होते. व्यासपीठावर नारी फाेरमच्या अध्यक्षा सुषमा कुलकर्णी, माजी अध्यक्षा कमलताई हुलजुते उपस्थीत होत्या. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते डॉ रामचंद्र महाराज पारनेरकर यांच्या पादुकांचे पूजन करण्यात अाले. यावेळी प्रतिभा शिरापूरकर यांनी अभंग गायन केले. नारी फाेरमच्या जिल्हा उपाध्यक्षा सुमती पिंगळे यांनी पुरस्कारार्थींचा परिचय करून दिला.यावेळी पुढे बाेलताना सरला जहागिरदार म्हणाल्या की, जहागीरदार कुटूंबासाठी अाजचा दिवस सर्वाेच्च अानंद देणारा असुन बीडमध्येही माझे कुटूंबीय अाहेत. सद‌्गुरूचरणी कृतज्ञता भाव व्यक्त करून मी हे सांगते की, अाज मला पूर्णवाद परिवाराच्या वतीने देण्यात अालेला हा पुरस्कार सद‌्गुरूचीच कृपा अाहे. गुरूची भाषा शिष्याला समजली पाहिजे. सासू-सूना या कुटुंबासाठी खंबीर असल्या पाहिजेत अाणि ही काळाची गरज अाहे. समजूतदारपणा असल्यास साक्षेपाने जीवन जगता येते.असे त्यांनी सांगीतले. यावेळी लिंबागणेश येथील नारी फाेरमच्या अध्यक्षा छाया साळवे यांचा सत्कार सुमती पिंगळे यांनी अाडगावकर यांचा सत्कार सुषमा कुलकर्णी यांनी अनिता जाेशी यांचा सत्कार शैला कुलकर्णी यांनी तर मंदिराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या बेहरे यांचा सत्कार अानंदी महाजन यांच्या हस्ते करण्यात अाला. कमलताई हुलजुते यांचा सत्कार अपर्णा धर्माधिकारी यांनी केला. यावेळी अाभार अानंदी महाजन यांनी मानले.

 

हा पुरस्कार प्रत्येक घरातील सासु-सुनेचा

सती साैभाग्यवती मनकर्णिका माता यांची ओळख मनूची अाई या नावाने होती. अापण जसे वागताे तसे नात्यातील बारीक वीण विणली जाते. मनकर्णीकामाता व विमलमाता पारनेरकर या अादर्श पत्नी बरोबरच आदर्श अाई ,अाजी होत्या. तर विमलमाता पंजी अाणि मनकर्णिका माता खापर पंजी झालेल्या आहेत. नवीन घरात आलेल्या सुनेला कसे वागायला पाहिजे यासाठीच सासूने थाेडा काळ सुनेला द्यावा लागताे. सासूनेच अाधी प्रेम द्यावे लागते. त्यामुळे घरातल्या मुलांना अाजीचे प्रेम मिळते अाणि अाजींना नातवंडे मिळतात. हा पुरस्कार माझा नसुन तो प्रत्येक घराघरांतील सासू सुनेचा आहे.

सरला जहागीरदार, आदर्श पुरस्कार प्राप्त सासू ,

 

सासु सासरे माझे आदर्शच

 सासू ही अाई असते परंतु त्यांना वेगवेगळ्या दिव्यातून जावे लागते. सती साैभाग्यवती मनकर्णीकामातेचे सर्वच गुण विमलमातेत अाले हाेते. त्यामुळे त्या दाेघींतील परस्पर स्नेह हे महत्त्वाचे ठरते. अामच्या सासूबाईंना दहा-दहा किलाेमीटर अंतरावरून पाणी अाणावे लागले हाेते, त्यांनी खूप कष्ट घेतले अाहेत अाणि त्यांचे घरात लक्ष असल्यामुळेच माझे सासरे ज्यांना मी काका म्हणते ते खूप उंचीवर जाऊन पाेहाेचले. माझे सासु- सासरे हे माझ्यासाठी अादर्श अाहेत.

पल्लवी जहागिरदार, आदर्श पुरस्कार प्राप्त सुन

Sharing

Visitor Counter