मुद्रांक शुल्काच्या दंडाबाबत सवलत योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

मुद्रांक शुल्काच्या दंडाबाबत सवलत योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
बीड/वार्ताहर
1 एप्रिल 2022 पासून सुरु झालेल्या नोंदणी व मुद्रांक शुल्क दंड सवलत योजनेमधील पहिला टप्पा दि. 31 जुलै 2022 रोजी संपत असून थकित मुद्रांक शुल्क व शास्ती अथवा थकित शास्ती या संबधी पक्षकारांना 31 मार्च 2022 पूर्वी नोटीस प्राप्त झालेल्या असतील व त्यांनी अद्यापपर्यंत योजनाचा लाभ घेतला नसेल त्या संबधित पक्षकारांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्याचे सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाशी संर्पक साधावा व दंड सवलत योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी बीड यांनी केले आहे.
संबधित पक्षकारांनी 31 जुलै 2022 रोजीपर्यंत मुद्रांक शुल्क दंड सवलत योजनेचा लाभ घेतल्यास सवलतीच्या पहिल्या टप्प्याचा म्हणजे थकित शास्तीवरील 90 टक्के सवलतीचा लाभ मिळेल अन्यथा पक्षकारांना दुस-या टप्प्यातील शर्तीप्रमाणे थकित शास्तीवर 50 टक्के दंड भरावा लागेल. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम कलम 31,32 (अ) 33,33, (अ) 46, 53 (1अ) व 53 (अ) अन्वये मुद्रांक महाराष्ट्र शुल्क शास्तीच्या संदर्भात 31 मार्च 2022 रोजी किंवा त्यापुर्वी नोटीस प्राप्त झालेल्या पक्षकारांकरीता सदर माफी योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे.
सदर योजना ही दि.1 एप्रिल 2022 ते 30 नेाव्हेबंर 2022 पर्यंत (8 महीने) कार्यान्वित राहणार आहे.सदर माफी योजना ही मुद्रांक शुल्काच्या तुटीच्या भागावर देय शास्तीच्या सवलतीसाठी जाहीर करण्यात आली असून 1 एप्रिल 2022 ते 31 जुलै 2022 या कालावधीत मुदांक शुल्क व दंडाची रक्कम भरल्यास अथवा मुद्रांक शुल्क यापूर्वीच भरले असल्यास दंडाची रक्कम भरल्यास, दंडाच्या रक्कमेत 90टक्के सुट मिळेल.
1 ऑगस्ट्र 2022 ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत मुद्रांक शुल्क व दंडाची रक्कम भरल्यास अथवा मुद्रांक शुल्क यापुर्वीच भरले असल्यास दंडाची रक्कम भरल्यास , दंडाच्या रकमेत 50टक्के सुट मिळणार आहे.
योजनेबाबत अधिक माहिती नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. याबाबत कोणतीही अडचण आल्यास जिल्ह्याचे सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी अथवा विभागाचे कॉल सेंटर 8888007777 व ईमेल आयडी complaint(at)igrmaharashtra(dot)govin यावर संपर्क साधावा.








