बहुजनांमध्ये क्रांतीचा दिवा पेटवणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांचे विचार प्रेरणादायी - स्वाती खुळे

Beed

बहुजनांमध्ये क्रांतीचा दिवा पेटवणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांचे विचार प्रेरणादायी - स्वाती खुळे

बीड/प्रतिनिधी

लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त न्यायिक मानवाधिकार परिषदेच्या बीड जिल्हाध्यक्षा स्वाती खुळे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. 

यावेळी स्वाती खुळे या अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल गौरवोद्गार काढताना म्हणाल्या की, आण्णाभाऊ साठे हे केवळ लेखक नव्हते ते शाहीर आणि बहुजनांचा आवाजही होते. त्यांनी लिहीलेली अनेक पुस्तके रशियामध्ये लोकप्रिय झाली आणि विविध भाषांमध्ये भाषांतरीतही  झाली. आजही त्यांच्या लेखणावर प्रेम करणारा वाचक मोठ्या प्रमाणावर आहे. तत्कालीन सामाजिक स्थिती आणि कौटुंबीक परिस्थिती यांमुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही. तरीसुद्धा त्यांनी आपल्या लेखणीतून क्रांतीचे स्फुल्लींग पेटवले. आंबेडकर आणि मार्क्सवादी विचार ही त्यांच्या लेखणातील प्रेरणा होती. त्यांनी आयुष्यभर बहुजनांचे आणि कामगारांचीच सुख-दु:खे लेखणीतून मांडली. आजही त्यांचे विचार अनेकांना भाराऊन टाकतात.
अण्णा भाऊ साठे म्हणूनच त्यांना महाराष्ट्र आणि जगभर ओळखले गेले. ते मातंग समाजातून येत. लोकशाहीर, समाजसुधारक, लोककवी आणि लेखक अशी त्यांची सामाजिक ओळख होती. त्यांचे लिखान वास्तववाधी होते. साम्यवादाच्या प्रभावातून त्यांनी लिखाण, सामाजिक कार्य सुरु केले. मात्र, पुढे त्यांनी आंबेडकरी विचार आपालासा केला.अण्णाभाऊ साठे यांनी समाजपरिवर्तनासाठी लिखान केले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडण आणि परिवर्तनवादी चळवळ यांमध्ये अण्णाभाऊ साठे यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी आपल्या लिखाणात नेहमीच उपेक्षीतांच्या जगण्याचा धांडोळा घेतला. उपेक्षीतांच्या अंतरंगाचा वेध हा त्यांच्या लिखाणाचा गाभा होता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णाभाऊ साठे यांचे योगदान मोठे राहिले.
यावेळी न्यायिक मानवाधिकार परिषदेच्या बीड जिल्हाध्यक्षा स्वाती खुळे यांच्या समवेत नंदा भंडारे, नयना भाकरे अभिवादन करण्यासाठी उपस्थित होत्या.

Sharing

Visitor Counter