जिल्ह्यातील १८ केंद्रांवर होते नीट परिक्षा 

Beed

जिल्ह्यातील १८ केंद्रांवर होते नीट परिक्षा 

बीड/प्रतिनिधी

भारत भर होणाऱ्या नीट परिक्षा आज पार पडत असुन बीड जिल्ह्यात अठरा सेंटर वर होत आहे.परिक्षेत मुलांचा मुठा सहभाग दिसुन येत होता वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक ' नीट ' ( नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट ) परीक्षा आज होत आहे . जिल्ह्यातील १८ केंद्रांवर परिक्षा सुरू झाली असुन भावी डॉक्टरांसाठी होत असलेल्या परिक्षेसाठी केंद्रा बाहेर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे . बारावीनंतर वैद्यकीय शाखेला प्रवेश मिळण्यासाठी देशपातळीवर एकाच वेळी परीक्षा घेतली जाते . नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत ‘ नीट’ची ही मल्टिपल चॉइस क्वेश्चनच्या ( एमसीक्यू ) आधारे ही पात्रता परीक्षा घेतली जाते . बारावीच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ही महत्त्वाची परीक्षा आहे . यंदा बीड जिल्ह्यात साडेसहा हजारांहून अधिक विद्यार्थी परीक्षा देत आहेत . बीड शहरासह जिल्हा भरातील परिक्षा केंद्राबाहेर पालकांची गर्दी झाली होती .

Sharing

Visitor Counter