आष्टीच्या नायब तहसिलदार शारदा दळवी कोरोना योद्धा सन्मानपत्राने सन्मानित

आष्टीच्या नायब तहसिलदार शारदा दळवी कोरोना योद्धा सन्मानपत्राने सन्मानित
आष्टी/प्रतिनिधी
देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा सातत्याने वाढत असतानाच महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. कोरोना व्हायरसपासून रुग्णांचा बचाव करता यावा यासाठी आष्टीच्या नायब तहसीलदार शारदा दळवी यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता आष्टी तालुक्यामध्ये कोरोना (कोविड १९) महामारीच्या काळामध्ये कोरोना विरोधी लढाईत प्रत्यक्ष भाग घेऊन महामारीपासून सामान्य जनतेचे संरक्षण करण्यासाठी लढा देत आहेत.त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिवन गौरव व एकता फाऊंडेशनच्या वतीने कोरोनायो8द्धा हे सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
कोरोना या व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्रशासन, राज्यशासन,जिल्हाप्रशासन, तालुकास्तरावर,ग्रामस्तरावर शासकीय निमशासकीय सेवेतील कर्मचारी अहोरात्र काम करत आहे.बाहेरील शहरातुन आलेल्या व्यक्तींमुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी या व्यक्तींना होम क्वारंटाईन ठेवणे ,तालुक्यामध्ये व शहरात सोशल डिस्टन्सिंगचे तंतोतंत पालन व्हावे यासाठी स्वता: नायब तहसीलदार शारदा दळवी यांनी हातामध्ये दंडुका घेऊन होणारी गर्दी टाळत होत्या ग्रामीण भागातील ऊसतोड मजुरांना क्वारंटाईन करुन त्यांची खाण्याची राहण्याची व्यवस्था त्यांनी स्वतः लक्ष घालून ग्रामस्तरावरील यंत्रणेला वेळोवेळी सुचना दिल्या, कोरोना या व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी त्यांनी गावात जाऊन जनजागृती करुन घेवयाची काळजी व करावयाच्या उपाययोजना याविषयी ग्रामस्थांना मार्गदर्शन करुन गोरगरिबांना किराणा किटचे सुद्धा वाटप केले या लाॅकडाऊनच्या कालावधीमध्ये तालुक्यातील नागरिकांचा कोरोनापासुन बचाव करण्यासाठी लढा देत आहेत.त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिवन गौरव व एकता फाऊंडेशनच्या वतीने कोरोना योद्धा सन्मानपत्राने सन्मानित करण्यात आले आहे.त्यांच्या या यशाबद्दल आ.सुरेश धस,आ.बाळासाहेब आजबे,माजी.आ.भीमराव धोंडे,माजी.आ.साहेबराव दरेकर, तहसिलदार वैभव महेंद्रकर, मुख्याधिकारी निता अंधारे,डाॅ संगीता तोडमल,आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम, अविशात कुमकर, निसार शेख,जावेद पठाण,सजय खंडागळे,बाळु राऊत,यशवंत हंबर्डे,बबलु सय्यद, मनोज सातपुते,राजेंद्र जैन,दिगाबर बोडखे, तुकाराम भवर, संतोष तागडे,किशोर निकाळजे,संतोष नागरगोजे, अण्णासाहेब साबळे,अक्षय विधाते, अतुल जवणे, कासम शेख आदींनी अभिनंदन केले आहे.








