कातरखटाव येथील मातंग समाजाचा अनेक वर्षाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अखेर संतोषभाऊ दुबळे यांच्यामुळे मार्गी लागला

कातरखटाव येथील मातंग समाजाचा अनेक वर्षाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अखेर संतोषभाऊ दुबळे यांच्यामुळे मार्गी लागला
मुंबई प्रतिनिधी/ आकाश साळवे
कातरखटाव ता. खटाव जि. सातारा येथे असणार्या मातंग समाजाच्या मागासवर्गीय वस्तीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न *शिवसेना विभागप्रमुख संतोष भाऊ दुबळे* यांच्यामुळे मार्गी लागला. संतोषभाऊ दुबळे हे कारखटाव पंचक्रोशीतील शिवसेना विभागप्रमुख आहेत.
देशाला स्वातंत्र्य होऊन ७२ वर्षे झाली तरी कातरखटाव येथील मातंग तसेच मागासवर्गीय समाज पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरत आहे याची संतोषभाऊंना मनामध्ये खंत होती. समाजातील महिला काबाडकष्ट करून संध्याकाळी थकून घरी आल्यानंतर त्यांच्यासमोर एकच प्रश्न आ करून उभा होता तो म्हणजे *पाणी -पाणी -पाणी* त्यांची ही केविलवाणी अवस्था संतोषभाऊ सारख्या बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला स्वस्थ बसू देत नव्हती, यामुळे *समाजाला पाणी मिळवून देणारच* अशी मनाशी एकप्रकारे खूणगाठ बांधून माझ्या समाजातील आई -बहिणीच्या माथी असणार्या पाण्याच्या गैरसोयीचा कलंक मिटवणारच हा जणू विडाच त्यांनी उचलला होता. म्हणून ते सतत शासनाकडे स्वखर्चाने वेळोवेळी पाठपुरवठा करत होते.
आज या पाठपुरठ्याला यश आले असून संतोषभाऊंकडुन २०१९-२०२० या साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी निमित्त आदरणीय अण्णाभाऊ यांच्या साहित्यातील कष्टकरी, संघर्षमय जीवन जगणाऱ्या महिलेला आणि मातंग समाजाला विस्मरणीय भेटच मिळाली आहे.
शिवसेनेचे बाळकडू हे शिवसेना विभागप्रमुख संतोषभाऊ दुबळे यांच्या नसानसामध्ये भिनले आहे. ते वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक आहेत. ते नेहमीच बाळासाहेबांच्या 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण या शिकवणीप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करत असतात, कार्यरत असतात त्यांच्या सामाजिक आणि विकासाचा कार्यक्रमांचा झंझावात दिवसंदिवस वाढतच चालला आहे. अशा त्यांच्या समाजाभिमुख कार्याचा सतत कौतुक होत आहे. संतोषभाऊ आपल्या अशा समाजोपयोगी कार्याला सलाम.








