रुग्णवाहिकेच्या अपघातात चालक जागीच ठार

Beed

रुग्णवाहिकेच्या अपघातात चालक जागीच ठार

परळी/प्रतिनिधी 

गंगाखेड रस्त्यावरील दगडवाडी जवळ झालेल्या रुग्णवाहिकेच्या अपघातात चालक जागीच ठार झाला . गजानन चिलगर असे मृत चालकाचे नाव आहे . ही घटना आज सकाळी नऊच्या सुमारास घडली असून घटनेची नोंद परळी ग्रामीण पोलिसांत झाली आहे . पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार , गंगाखेड येथील रुग्णवाहिका एका रुग्णाला अंबाजोगाई येथे सोडून परत गंगाखेडकडे जात होती . दगडवाडी जवळील चढावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने रुग्णवाहिका रस्त्याच्याकडेला पलटी झाली . यामध्ये रुग्णवाहिकेचा चालक गजानन हा जागीच ठार झाला . परळी ग्रामीण पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह परळी उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला .

Sharing

Visitor Counter