संपर्कहीन अमरनाथ यात्रेकरूंच्या नातेवाईकांनी माहिती देण्याचे आवाहन

Beed

संपर्कहीन अमरनाथ यात्रेकरूंच्या नातेवाईकांनी माहिती देण्याचे आवाहन

बीड/वार्ताहर 

अमरनाथ, जम्मू काश्मिर राज्य येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे दरड कोसळून यात्रेसाठी गेलेल्या काही भाविक, यात्रेकरूंचा मृत्यु झाल्याची बातमी प्रसारमाध्यमांद्वारे समोर आली असून, याठिकाणी भारतीय सेना दल, एनडीआरएफ आणि अन्य बचाव व प्रतिसाद दल यांच्यामार्फत मदत व बचाव कार्य सुरू आहे. तसेच अद्यापही काही भाविक, यात्रेकरू हे बेपत्ता असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

त्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील जे भाविक अमरनाथ यात्रेसाठी जम्मू व काश्मिर राज्यामध्ये गेलेले आहेत व सद्यस्थितीत त्या भाविक यात्रेकरूंचा संपर्क होत नाही, अशा भाविकांच्या निकट नातेवाईकांनी संबंधित तालुक्याचे तहसीलदार कार्यालय किंवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. राजदीप बनसोड भ्रमणध्वनी 7045704733 या क्रमांकावर संपर्क साधून त्याप्रमाणे माहिती द्यावी.

तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथील संपर्क दूरध्वनी क्र. 02442222604, टोल फ्री क्रमांक 1077 या क्रमांकावर संपर्क साधून त्याप्रमाणे माहिती द्यावी. अमरनाथ यात्रा दुर्घटनेच्या अनुषंगाने शासनस्तरावरून पुढीलप्रमाणे हेल्पलाईन क्रमांक एनडीआरएफ 01123438252, 01123438253, काश्मिर डिव्हीजनल हेल्प लाईन क्रमांक0194-2496240

Sharing

Visitor Counter