पेरणीच्या अंतिम टप्प्यासाठी दुस-या डोससाठी संरक्षित युरीया व डीएपी खतांचा साठा खुला

पेरणीच्या अंतिम टप्प्यासाठी दुस-या डोससाठी संरक्षित युरीया व डीएपी खतांचा साठा खुला
बीड/वार्ताहर
खरीप हंगाम 2022 करीता युरीया खताचा 3350 मे.टन व डीएपी खताचा 2120 मे.टन संरक्षित साठा करणे बाबतचा लक्षांक निर्धारीत करून देण्यात आला होता. त्यानुसार जिल्हयामध्ये 3190.045 मे.टन युरीया व 2074 मे.टन डीएपी खताचा संरक्षित साठा करण्यात आला आहे. यापुर्वी जिल्हा सनियंत्रण समितीच्या बैठकीतील मान्यतेनुसार युरीया खताचा संरक्षित साठा 1010 मे.टन (30%) व डीएपी खताचा संरक्षित साठा 1485 मे.टन (70%) मुक्त करण्यात आला होता.
सद्या खरीप हंगाम अंतीम टप्पयात असल्याने डीएपी खताचा उर्वरीत सर्व 589 मे.टन खत साठा व युरीया खताचा 1010 मे.टन खत साठा विक्रीसाठी खुला करण्यास जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षेताखालील जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीने मान्यता दिली आहे. यामुळे पेरणीच्या अंतीम टप्यात व दुस-या डोससाठी शेतक-यांना वेळेवर खते उपलब्ध होणार आहेत, असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, बीड यांनी कळविले आहे.








