सामान्य जनता ,शेतकरी,कामगारांची सुरक्षितता महत्वाची- सिद्धार्थ पैठणे यांचे प्रतिपादन

सामान्य जनता ,शेतकरी,कामगारांची सुरक्षितता महत्वाची- सिद्धार्थ पैठणे यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी/सी.एल.झोडपे
वाळुज एम.आय.डी.सी परिसरातील कारखाने उघडण्यासाठी कारखानदार तसेच प्रशासन अति घाई करत आहे,परंतु जागतिक आरोग्य संघटनेने सांगितल्या प्रमाणे आरोग्यासाठी उपयुक्त उपकरणे तसेच इतर गोष्टींची खबरदारी कोण घेणार आणि अंमलबजावणी होते की नाही याची खबरदारी घेऊन राज्य सरकारने दोन-तीन महिने घरी बसुन असलेल्या कामगारांच्या खात्यात पगार टाण्याचे आदेश देऊन लेखी स्वरूपात कारखाना व्यवस्थापनला कळवावे .कारण सर्व सामान्य जनतेचे कामगारांचे बेहाल या कोरोना महामारीच्या काळात झालेले आहेत.
"अति घाई संकटात नेई" या प्रमाणे जनजीवन सुरळीतपणे चालू करण्या अगोदर सुरक्षितेकडे लक्ष देऊन त्वरीत अंमलबजावणी करावी. असे मत वंचित बहुजन कामगार आघाडी चे औरंगाबाद जिल्हा सचिव सिद्धार्थ पैठणे यांनी त्यांना विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना सांगितले.








