आ. संदीप(भैय्या) क्षीरसागर साहेब संपर्क कार्यालय, बलभीम नगर, पेठ बीड येथे

आ. संदीप(भैय्या) क्षीरसागर साहेब संपर्क कार्यालय, बलभीम नगर, पेठ बीड येथे
बीड/वार्ताहर
दरवर्षी प्रमाणे याही वर्षे सत्यशोधक,साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 102 वी जयंती ची बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ अरविंद जावळे हे होते प्रमुख पाहुणे म्हणून तुळशीराम प्रभाळे, कुमार अरुण हे होते.सदरील जयंती ची कार्यकारणी जयंतीचे संस्थापक अध्यक्ष विनोद(दादा) हातागळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. गेल्या दोन-तीन वर्षापासून कोरोना असल्यामुळे जयंती साजरी झाली नव्हती. पण या वेळेस मोठ्या उत्साहात जयंती साजरी होणार आहे. या निमित्ताने विविध उपक्रमा चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच व्याख्यान, वृक्षरोपण, रक्तदान शिबीर, अन्नदान, संगीत रजनी, गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व ड्रेस वाटप अशा विविध सामाजिक उपक्रमाने जयंती साजरी होणार आहे. त्याच अनुषंगाने आज बलभीम नगर पेठ बीड येथे कार्यकारिणी निवडीची बैठकीचे आयोजन संस्थापक अध्यक्ष विनोद दादा हातागळे यांनी केले होते. सदरील बैठकीमध्ये सर्वानुमते अध्यक्षपदी राहुल जाधव, उपाध्यक्षपदी- श्रीमंत अंकुटे कृष्णा भालेराव
सचिव- कृष्णा पाटोळे, सहसचिव- राकेश कोकाटे, चेतन जाधव, कोषाध्यक्ष- श्याम गायकवाड, संघटक- रवी लांडगे,रामेश्वर शिरसागर, व्यवस्थापक- अभिजीत गायकवाड तर सदस्य पदी आनंद शिंदे, अमोल उमाप, निखिल हातागळे, भारत पिव्हळ, सुरज दुलगच, गणेश पाटोळे, आदित्य हातागळे, सुमित चांदणे, मन्या भाई, विनोद कोकाटे आदींची निवड करण्यात आली. या वेळी तुळशीराम प्रभाळे, दिलीप धनवे, कुमार भाऊ अरुण, भिसे नाना, कचरू वाघमारे अश्विन निसर्गंध, शालिंदर सौदा, सोनू लांडगे, के के कांबळे हे उपस्थित होते.या सर्वांचे अभिनंदन व आभार प्रदर्शन स्वप्नील भैया हातागळे यांनी केलं.








