सैन आणि पोलिस दलात 37 वर्षे सेवा

Beed

सैन आणि पोलिस दलात 37 वर्षे सेवा
बाबासाहेब घोडके यांच्या देश सेवेचा सेवापुर्ती निमित्त गौरव

बीड/प्रतिनिधी

स्वत:च्या प्राणांची पर्वा न करता देशासाठी लढणार्‍या भारत मातेच्या प्रत्येक सुपुत्राचा भारतीयांना अभीमान आहे. बीडच्या बाबासाहेब घोडके नावाच्या भुमीपुत्राने सैन्य दलात 19 वर्षे तर देशाअंतर्गत पोलिस दलात 18 वर्षे अशी तब्बल 37 वर्षे देशाची सेवा केली. प्रदीर्घ देश सेवेनंतर नियत वयोमानानुसात बाबासाहेब घोडके हे नुकतेच पोलिस हवलदार म्हणून सेवा निवृत्त झाले. देशावर निस्सीम प्रेम असलेल्या या बीडच्या भुमीपुत्राचा सेवानिवृत्त बहुजन अधिकारी- कर्मचारी महासंघाच्या वतीने धानोरा रोड येथील जिल्हा कार्यालयात गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डी.जी. वानखेडे तर प्रमुख पाहुणे म्हणून कॅप्टन राजाभाऊ आठवले यांची उपस्थिती होती.
सेवानिवृत्त बहुजन अधिकारी- कर्मचारी महासंघाचे बीड जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ आठवले हे सैन्य दलात ज्या कंपनीचे कॅप्टन होते. त्याच कंपनीत दोन वर्षे राहुन देश सेवा करण्याची संधी बाबासाहेब घोडके यांना मिळाली. यामुळे सेवापुर्ती सोहळ्याला वेगळे महत्व प्राप्त झाले होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या कॅप्टन राजाभाऊ आठवले यांनी बाबासाहेब घोडके हे त्यांच्या कंपनीत सैनिक म्हणून काम करत असतानाचे अनेक प्रसंग आणि आठवणींना उजाळा दिला. देश सेवा करताना आलेली संकटे अन् त्या संकटांचा केेलेला सामना याचे चित्र त्यांनी डोळ्यासमोर उभे केले. दरम्यान बाबासाहेब  घोडके यांनी 19 वर्षे देशसेवा केल्यानंतर स्वस्थ न बसता ते महाराष्ट्र पोलिस दलात हेड कॉन्स्टेबल म्हणून रूजू झाले. पोलिस दलात त्यांनी तब्बल 18 वर्षे निष्कलंकपणे सेवा केली. सैन दलातील 19 आणि पोलिस दलातील 18 अशी तब्बल 37 वर्षाची प्रदिर्घ सेवेनंतर बाबासाहेब घोडके हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. परंतू ते देश सेवेतून निवृत्त झाले असले तरी समाजसेवेत सक्रीय झाले असल्याची माहिती जी. एम. भोले यांनी दिली. सेवानिवृत्त होताच सेवानिवृत्त बहुजन अधिकारी, कर्मचारी महासंघाचे सदस्यत्व स्विकारून बाबासाहेब घोडके यांनी सामाजिक दायीत्व दाखवून दिले असल्याचेही जी. एम. भोले यांनी सांगीतले.
या कार्यक्रमात  सेवानिवृत्त बहुजन अधिकारी- कर्मचारी महासंघाचे जेष्ठ सभासद राणाप्रताप कदम यांचा 81 व्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. दरम्यान राणाप्रताप कदम यांनी वाढदिवसाचे औचित्य साधुन कुक्कडगाव शाळेतील विद्यार्थ्यांना 14 हजार रूपयांचे शैक्षणिक साहित्य वाटप केले असल्याची माहिती विभागीय अध्यक्ष जी.एम. भोले यांनी दिली. यावेळी एस. ए. सोनवणे, आशाताई विद्यागर, बी.जी. दळवी व सेवानिवृत्त बहुजन अधिकारी- कर्मचारी महासंघाचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डी. एम. राऊत यांनी तर उपस्थितांचे आभार काशीनाथ वाघमारे यांनी मानले.

सिमेवरील गावात फिरून शोधले अतिरेकी
बाबासाहेब घोडके यांनी बहुतांश सेवा महार रेजीमेंट सेंटर सागर मध्यप्रदेश येथे ट्रेनिंग इंन्स्टेक्टर म्हणून केली. दरम्यान 1990 साली कॅप्टन राजाभाऊ आठवले यांच्या कंपनीत पंजाब मधील फिरोजपुर येथे काही वर्षे त्यांनी देशसेवा केली. यावेळी नेमकाच दहशतवाद पुढे आला होता. यावेळी आठवले आणि घोडके या बीडच्या भुमीपुत्रांनी आपल्या जीवाची पर्वा न करता सिमेवरील गावागावात जावून दशतवाद्यांचा शोध घेतला. दहशतवाद उफळणार नाही, याची काळजी घेतली.

Sharing

Visitor Counter