एआयएमआयएम पक्षाकडून नगर परिषद निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी सर्व तालुकाध्यक्ष व शहराध्यक्षांकडे अर्ज उपलब्ध - शेख एजाज, शिवाजी भोसकर, सय्यद सैफअली

एआयएमआयएम पक्षाकडून नगर परिषद निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी सर्व तालुकाध्यक्ष व शहराध्यक्षांकडे अर्ज उपलब्ध - शेख एजाज, शिवाजी भोसकर, सय्यद सैफअली
बीड/प्रतिनिधी
लवकरच होणाऱ्या नगरपरिषदांच्या निवडणुकीकरिता एआयएमआयएम पक्षाकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी अर्ज आलेले आहेत. प्रत्येक तालुक्याचे अध्यक्ष व शहराध्यक्ष यांच्या कडे अर्ज देण्यात येणार असून इच्छुकांनी आपापल्या तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष व प्रभारी यांच्याशी दिनांक १२ जुलै ते २० जुलै २०२२ पर्यंत संपर्क साधून अर्ज दाखल करावे. असे आवाहन पक्षाचे बीड तालुकाध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष शेख एजाज़ आणि बीड शहराध्यक्ष शिवाजीराव भोसकर जिल्हा समन्वयक सय्यद सैफअली यांनी केले आहे.
आगामी नगरपरिषदांच्या निवडणूकसाठी एआयएमआयएम पक्ष बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आपले उमेदवार मैदानात उतरवणार आहे. पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. जिल्ह्यातील बीड, गेवराई, माजलगाव, धारूर, अंबाजोगाई, परळी या सर्व नगर परिषदांच्या निवडणुकीत एआयएमआयएम पक्ष उमेदवार उतरविणार आहे. याकरिता पक्षाध्यक्ष तथा खासदार अल्हाज असदोद्दीन ओवैसी, प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज़ ज़लील, प्रदेश कार्याध्यक्ष डॉक्टर अब्दुल गफ्फार कादरी, मराठवाडा प्रभागाध्यक्ष फिरोज़ लाला, मराठवाडा समन्वयक सुमेर रिज़वी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफिक भाऊ यांनी इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज उपलब्ध करुन दिले आहेत. प्रत्येक तालुक्यातील इच्छुकांनी पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून अर्ज दाखल करावेत. तसेच बीड नगर परिषद करिता निवडणुक लढविण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी पक्षाचे शहरातील बशीरगंज मधील मुख्य कार्यालयात संपर्क साधावा किंवा बीड तालुकाध्यक्ष शेख एजाज़ (खन्ना भैय्या मो.- 9822548492) समन्वयक सय्यद सैफ अली (लालू भैय्या मो. - 9420655505) आणि शहराध्यक्ष शिवाजीराव भोसकर (शिवा भाई मो. - 9111337337) यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.








