शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सचिन मुळूक शिंदे गटात

शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सचिन मुळूक शिंदे गटात
बीड/प्रतिनिधी
आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सचिन मुळूक यांनी घोषणा केली की मी शिंदे गटात असुन माझ्या संपर्कात ७० पदाधिकारी आहेत ते पण लवकरच शिंदे गटात प्रवेश घेणार तसेच चंद्रकांत खैरैंवर कडाडून टिका केल्या.माझ्यासारखे लाखो शिवसैनिक गेली २५ वर्ष एकनिष्ठेने काम करत आहेत . मात्र राष्ट्रवादीमुळे आमच्या एकनिष्ठतेवर खोडा पडल्याचे स्पष्ट करत उध्दवसाहेब आमचे नेते आहेत आणि राहतील मात्र त्यांनी राष्ट्रवादीची साथ सोडावी अशी अपेक्षा शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी व्यक्त केली . शिवसेना स्व . बाळासाहेब ठाकरे आणि स्व . आनंद दिघे यांची आहे . आमच्या रक्तातही शिवसेनाच असुन यापुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भुमिका यावेळी सचिन मुळूक यांनी जाहिर केली .बीड येथे आज दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेच शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी शिंदे गटात जात असल्याचे जाहिर केले . यावेळी योगेश नवले , संदीप उबाळे , गणेश जगदाळे यांची उपस्थिती होती . शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख आनंद जाधव हे दलाल आहेत का ? असा प्रश्न उपस्थित करत ते माजलगावातील वाळु टेंडरमध्ये दलालीसाठी जिल्ह्यात येतात असा आरोप मुळूक यांनी यावेळी केला . मराठवाडा संपर्क प्रमुख चंद्रकांत खैरे यांच्या द्वेषभावनेमुळे माझे पद गेल्याचा उल्लेख मुळूक यांनी यावेळी केला . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणे झाले असुन जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या मनातील खदखद त्यांना सांगितली . येथील शिवसैनिकांचे हाल होवु नयेत याची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडुन घेतली जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली . जिल्हा शिवसेनेतील जवळपास ७० पदाधिकारी माझ्या संपर्कात असुन लवकरच त्यांची भुमिका स्पष्ट केली जाईल असा दावाही सचिन मुळूक यांनी केला .








