नगर परिषद निवडणूक पूर्व एआयएमआयएम चा परळी-अंबाजोगाईत आढावा व नियोजन दौरा !

नगर परिषद निवडणूक पूर्व एआयएमआयएम चा परळी-अंबाजोगाईत आढावा व नियोजन दौरा !
प्रस्थापितांना धक्के दिल्याशिवाय शहरांचे विकास होणार नाहीत - ॲड. शेख शफीक भाऊ
बीड/प्रतिनिधी
एआयएमआयएम पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफीक भाऊ यांच्या नेतृत्वाखाली आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा व नियोजन दौरे सुरू आहेत. या अनुषंगाने परळी व अंबाजोगाई येथेही आढावा व नियोजन दौरा घेण्यात आला. या दौऱ्यात शफीक भाऊंसोबत बीड जिल्हा उपाध्यक्ष तथा बीड तालुका अध्यक्ष शेख एजाज खन्ना भैय्या, जिल्हा सहसचिव अन्वर पाशा, जिल्हा समन्वयक सय्यद सैफ अली लालु भैय्या, बीड शायर शाहनवाज खान यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना शफीक भाऊ म्हणाले राजकारणातील प्रस्थापितांना धक्के दिल्याशिवाय शहरांचे विकास होणार नाहीत. तेव्हा प्रस्थापितांना बाजूला सारा आणि एआयएमआयएम च्या नव्या कोऱ्या करकरीत चेहऱ्यांना लोकसेवक म्हणून आगामी निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी करत शहरांचे विकास करण्याची संधी द्या असे प्रतिपादन केले.
यावेळी परळीत झालेल्या सभेमध्ये शफीक भाऊ म्हणाले मुस्लिम बहुल परिसरामध्ये चालायला धड रस्ते नाही. नाल्यांची वाणवा आहे. परळी नगर परिषदेवर उर्दूतून बोर्ड लावण्याकरिता एआयएमआयएम पक्षाचे परळी तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक शेख शरीफ भाई यांनी पाठ पुराव्यासह उपोषण करून उर्दूतून बोर्ड लावायला भाग पाडले. यात मुंडे बंधू भगिनी कुठेच नव्हते. मुस्लिम समाजातील मुलींसाठी बनविण्यात आलेल्या हॉस्टेल च्या इमारती बांधून चार-पाच वर्ष होत आली आहेत. परंतु या इमारतींचे उद्घाटन करून त्या जनसेवेत देण्याकरिता जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना एवढ्या मोठ्या कालावधीत उद्घाटन करण्यास वेळ मिळाला नाही. किती ही मुस्लिम समाजाची क्रूर चेष्टा म्हणावी. मुंडे-मुंडे या बहिण-भावांनी आपसात भांडण व हेवेदाव्याचे नाटक करीत इतरांना राजकारणात येऊन जनसेवा करण्याची संधीच न देण्याची जणू काही शपथच घेतली आहे. जनतेमध्ये फक्त मुंडे घराण्याचीच चर्चा होत रहावी. इतरांना राजकारणात स्थापित होता येऊ नये. म्हणून सगळा आटापिटा चालला आहे. या नाटकाला सर्वसामान्य मतदार जनता बळी पडत आहे. परंतु आता यांचे हे नाटक चालणार नाही. एआयएमआयएम पक्ष संपूर्ण ताकदीनिशी बीड जिल्ह्यातील सर्व नगर परिषद निवडणुका लढविणार असून घराणेशाहीचे राजकारण हद्दपार करणार आहे.
अंबाजोगाई येथे झालेल्या सभेत बोलताना शफीक म्हणाले देशात नरेंद्र आणि अंबाजोगाईत राजकिशोर या मोदींनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. नरेंद्र मोदी हे चुकीचे निर्णय घेऊन हुकूमशहा प्रमाणे ते जनतेवर लादत आहेत. यातूनच त्यांच्या डोक्यातून देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना त्यांनी अवघे चार वर्षाचे करार करून एखाद्या गुलामासारखे वागविण्याचा निर्णय अग्निवीर या गोंडस नावाखाली घेतला आहे. तर येथील राजकिशोर मोदी हे मूळचे काँग्रेसी परंतु जिल्ह्यात झालेले काँग्रेसचे हाल आणि बघता-बघता रसातळाला गेलेली काँग्रेस पाहून या पक्षाची फारकत घेत स्वहितासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. आणि आता राष्ट्रवादीचे गुणगान गात आहेत. मात्र या राजकिशोर उर्फ पापा मोदींनीही मुस्लिम बहुल प्रभागांवर गेल्या २५ वर्षापासून विकासाच्या बाबत अन्याय केला आहे. एकीकडे शहरातील इतर प्रभाग बीड शहराला लाजवतील असे केले तर दुसरीकडे मात्र मुस्लिम बहुल प्रभागांमध्ये विकास काय असतो याचे दर्शनच होऊ दिले नाही. शहरातील इतर प्रभागांसारखा मुस्लिम बहुल प्रभागांमध्ये ही विकास होणे यावर मुस्लिमांचा हक्क आहे. परंतु तो पापा मोदींनी आजपर्यंत दिला नाही. म्हणून आता मुस्लिम समाजाला व मुस्लिम बहुल प्रभागांना न्याय देण्याकरिता एआयएमआयएम पक्ष संपूर्ण ताकदीनिशी आगामी नगरपरिषद निवडणुकांमध्ये उतरणार असून पक्षातर्फे उमेदवार दिलेल्या उमेदवारांना जनतेने प्रचंड बहुमताने निवडून देत विकास करण्याची संधी द्यावी असे प्रतिपादन केले.
यावेळी परळी मध्ये तालुकाध्यक्ष शेख शरीफ, शहराध्यक्ष अकबर कच्छी, तालुका युवक अध्यक्ष शेख आबेद, युवक शहराध्यक्ष शेख अन्वर, शहर उपाध्यक्ष शेख तौफीक, शहर चिटणीस शेख अतीख, तालुका उपाध्यक्ष एजाज खान, तालुका उपाध्यक्ष शेख सलीम, शहर उपाध्यक्ष शेख उमर, शहर उपाध्यक्ष शेख अन्वर, शहर कार्याध्यक्ष पठाण फिरोज खान, सिरसाळा शहर कमिटीचे शहराध्यक्ष पठाण जुम्मन खान, शहर उपाध्यक्ष सय्यद रियाज, सर्कल अध्यक्ष सय्यद फरहान, सल्लागार सय्यद मोईन. अंबाजोगाईत बीड जिल्हा प्रवक्ता तथा तालुका प्रभारी शेख चाँद (रमीज सर), शहराध्यक्ष हिफाजत मीर खाँ, युवा तालुकाध्यक्ष शेख समीर, युवा शहराध्यक्ष अब्दुल सत्तार तांबोळी, आरोग्य सेल तालुकाध्यक्ष शेख फिरोज, आरोग्य सेल शहराध्यक्ष आरेफ सिद्दिकी, महिला तालुकाध्यक्षा शेख सुभानी, महिला शहराध्यक्षा यास्मिन तांबोळी, शहर युनियन अध्यक्ष आरेफ काजी, सोशल मीडिया शहर प्रभारी अशरफ बागवान, व्यापारी महासंघ शहराध्यक्ष शेख जाफर, सायगाव शहराध्यक्ष सय्यद रईसोद्दीन, सायगाव शहर उपाध्यक्ष सय्यद मकसूद अली, बर्दापूर शहराध्यक्ष महबूब कुरेशी, बर्दापूर शहर उपाध्यक्ष शेख समीर आणि शेकडो नागरिक उपस्थित होते.








