महापुरूषांच्या मानवतावादी कार्याचा केंद्रबिंदु राजर्षी शाहु महाराज-राहुल गिरी

महापुरूषांच्या मानवतावादी कार्याचा केंद्रबिंदु राजर्षी शाहु महाराज-राहुल गिरी
सेवा निवृत्त बहुजन अधिकारी- कर्मचारी महासंघाने केला गुणवंतांचा गौरव
बीड/प्रतिनिधी
फुले- शाहु- आंबेडकर या थोर महापुरूषांच्या मानवतावादी कार्याचा केंद्रबिंदु छत्रपती राजर्षी शाहु महाराज आहेत. त्यांनी आपल्या राजवटीतील संपुर्ण काळ बहुजण हित, सर्वांना शिक्षण आणि स्वाभीमान मिळवून देण्यासाठी राज्य कारभार केला. यामुळेच राजर्षी शाहु महाराज खर्या अर्थाने रयतेचे राजे होते, असे प्रतिपादन युवा वक्ता राहुल गिरी यांनी केले. ते छत्रपती राजर्षी शाहु महाराज यांच्या जयंतीनिमित्त सेवा निवृत्त बहुजन अधिकारी- कर्मचारी महासंघाने आयोजित गुणवंत केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभात बोलत होते.
सेवा निवृत्त बहुजन अधिकारी- कर्मचारी महासंघाच्या वतीने महारूषांचे विचार आणि कार्याला अभीप्रेत असलेले कार्यक्रम जयंती- उत्सवाच्या निमित्ताने सातत्याने घेतले जातात. बहुजणांचे राजे छत्रपती राजर्षी शाहु महाराज यांची 148 जयंती 26 जुन रोजी धानोरा रोड येथील कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने अभिवादन कार्यक्रम व गुणवंतांचा गुणगौरव करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यस्थानी सत्यशोधक ओबीसी परिषदेचे राज्याध्यक्ष संदीप उपरे तर प्रमुख पाहुणे म्हणून अमरसिंह ढाका तर प्रमुख वक्ते म्हणून युवा वक्ता राहुल गिरी, कॅप्टन राजाभाऊ आठवले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रस्ताविक करताना जी.एम. भोले यांनी छत्रपत्री राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्या मागचा उद्देश सांगीतला. तसेच सेवा निवृत्त बहुजन अधिकारी- कर्मचारी महासंघाच्या वतीने राबवण्यात येणार्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात संदीप उपरे म्हणाले, शिक्षणाशिवाय आज पर्याय नाही. विद्यार्थ्यांनी आपल्या आई- वडीलांच्या कष्टाची जाण ठेवून आपले ध्येय निश्चित करावे. ठरवलेले ध्येय साध्य करण्यासाठी गुरूजणांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्नांची पराकाष्ठा करावी. परिश्रम घेणार्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीशी समाज कायम उभा रहातो, असे ते शेवटी म्हणाले. यावेळी प्रमुख वक्ते राहुल गिरी यांनी छत्रपती शाहु महाराजांच्या जीवनातील अनेक प्रसंग सांगीतले. शाहु महाराजांनी समतेची स्थापना करण्यासाठी क्रांतीकारी निर्णय घेऊन बहुनांणा 50 टक्के आरक्षण देणारा जगातील पहिला कायदा केला. प्रत्येकासाठी मोफत आणि सक्तीचे केले, शेतकर्यांच्या उध्दारासाठी राधानगरी धरण बांधले, किर्लोस्करांच्या माध्यमातून अद्योगीत प्रगती, अंधश्रध्दा निमुर्लन, विधवा पुनर्विवाहासाठी प्रयत्न, जाती- अंतासाठी अंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन, अस्पृष्यता नष्ट करण्यासाठी महान कार्य केले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना उच्च शिक्षणासाठी शाहु महाराजांनी बहूमोल अशी मदत केली. या त्यांच्या महान कार्यामुळेच शाहु महाराजांना बहुजनांचा उध्दारक असे संबोधले जात असल्याचे राहुल गिरी म्हणाले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गिरी म्हणाले, परिक्षेत केवळ उच्च गुण न मिळवता गुणाच्या अधारे मिळवलेल्या ज्ञानाला शिलाची जोड द्या. स्व हिताबरोबर समाज हितही जोपासण्यासाठी फुले- शाहू- आंबेडकर या महामानवांचे विचार विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर ठेवून पुढील वाटचाल करावी, असे राहुल गिरी शेवटी म्हणाले.
यावेळी अमरसिंह ढाका यांनी देखील गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी मान्यवरांच्या हस्ते इयत्ता दहावीतील प्रेरणा नागसेन मस्के (69.40), तुनुजा अनिल विद्यागर (96 टक्के), राजकी राजेश जाधव (93.80), वैभव शहादेव गायकवाड (91.06), आर्यन विजय भुतके (88.60), सुजय संजय भुतके (85 टक्के), तसेच बारावीतील आयुष संजय जोगदंड (96 टक्के), अपुर्व मोहन गवई (85 टक्के), प्रशिक राजेश जाधव (85 टक्के) या गुणवंत विद्यार्थ्यांचा पेन व गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला. आमचा सत्कार करताना मान्यवरांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा अम्ही नक्कीच पुर्ण करू, असे सत्काराला उत्तर देताना गुणवंत विद्यार्थी म्हणाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डी.एम. राऊत यांनी तर उपस्थितांचे आभार डी.जी. वानखेडे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमास काशीनाथ वाघमारे, सुधाकर विद्यागर, अॅड. डी.एम. विद्यागर, शिवाजीराव पंडीत, भीमराव गायकवाड, मोहन गवई, एस. ए. सोनवणे, बळीराम दळवी, नागसेवन मस्के, अनिल विद्यागर तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक, सेवा निवृत्त बहुजन अधिकारी- कर्मचारी महासंघाचे सदस्य उपस्थित होते.
फोटो- बीड : गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना सेवा निवृत्त बहुजन अधिकारी- कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी व मान्यवर








