बीडच्या नवजीवन व्यसनमुक्ती केंद्रात शाहुमहाराज जयंती साजरी

बीडच्या नवजीवन व्यसनमुक्ती केंद्रात शाहुमहाराज जयंती साजरी
बीड/वार्ताहर
क्रांतिज्योत बहुउद्देशिय सेवाभावी संस्था संचलित बीडचे नवजीवन व्यसनमुक्ती केंद्र हे डॉ . राजकुमार गवळे व प्रकल्प संचालिका प्रा . अंजलीताई पाटील यांच्या प्रमुख मार्गदशनाखाली अंत्यत चांगली कामगिरी व बजावत आहे . आजवर अनेक व्यसनी बांधवांना जिवनाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नवजीवनने चांगले प्रयत्न केले आहेत . असे प्रतिपादन बीडच्या बालकल्याण समितीचे तत्वशील कांबळे यांनी केले.ङ्गनवजीवन व्यसनमुक्ती केंद्र बीड द्वारा आयोजित लोकराजा छत्रपती शाहूमहाराज जंयती व जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाच्या प्रारंभी शाहुमहाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व्यसनाविरोधात शपथ घेउन करण्यात आली कार्यक्रमास प्रमुख म्हणून प्रा . विनोद सोनवणे , सामाजिक कार्यकर्ते संतोष निकाळजे हे उपस्थित होते . मान्यवरांचे यावेळी शाल , श्रीफळ , व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात व यावेळी मान्यवरांनी आपले मनोगते व्यक्त केली .कार्यक्रमाचे प्रास्ताविक नवजीवन व्यसनमुक्ती केंद्राचे प्रकल्प समन्वयक प्रा . आजिनाथ शेरकर यांनी केले तर सूत्रसंचालन कामिनी पवार यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी , कौटुंबीक सल्लागार वर्षा शेरकर मॅडम , समुपदेशक गोविंद शिंदे , पिकअप इंचार्ज रितेश सरवदे केयरटेकर माधव काळे , किचन इंचार्ज मिना भिंगारे , स्विपर तारामती सरवदे , तसेच हॅपी लिव्हिंग विथ अमर या योग संस्थेचे प्रमुख तसेच केंद्राचे योग प्रशिक्षक अमर भुंगुर्डे , अकाउंटट ललिता मांदळे , मस्के सीमा , काळजीवाहक सौरभ धांडे , नाईट शिफ्ट ब्रदर राजेंद्र रहाडे यांनी प्रयत्न कले.








