नगरपरिषदेचा गलथान कारभारामुळे पावसाचे पाणी चक्क लोकांच्या घरात

नगरपरिषदेचा गलथान कारभारामुळे पावसाचे पाणी चक्क लोकांच्या घरात
बीड/प्रतिनिधी
शनिवार दि . २५ जून रोजी बीड शहरात दुपारी पाचच्या दरम्यान जोरदार पाऊस झाला . या पावसाने शहरातील सर्व रस्त्यांवर पाणीच- पाणी झाले . शहरातील नाल्यांतील घाण पाणी नागरिकांच्या घरात व व्यापाऱ्यांच्या दुकानात घुसले याला जबाबदार नगरपरिषदेचा स्वच्छता विभाग असून जनतेने वारंवार मागणी करूनही पावसाळ्यापूर्वी शहरातील नाल्यांची सफाई झाली नाही त्यामुळे नाल्या तुंबल्याने सर्व घाण कचरा रस्त्यावर बाहेर पडला . या पावसामुळे रस्त्यावरील पाण्यामुळे शहरातील नागरिकांची दैना उडाली त्यामुळे आता तरी नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाने जागे व्हावे कारण पुढे आणखी मोठा पाऊस येणार असून बीड शहरातील तुंबलेल्या नाल्यांमुळे पुन्हा रस्त्यावर पाणी साचून नागरिकांना शहरात वागणे कठीण होईल , तसेच वाहनचालकांचा या रस्त्यावरील साचलेल्या पाण्यामुळे अपघात होऊ शकतो याचा विचार नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाने करावा त्यामुळे बीड शहरातील सर्व नाल्यांची तात्काळ सफाई करून नाल्यांची सफाई करावी . नगरपरिषदेचे सिओ ढाकणे साहेब आपण एकदा शहरातील रस्त्यांवर आल्यावरच त्यांना पावसाच्या पाण्यामुळे शहरातील साचलेल्या पाण्याची अवस्था कळेल तसेच बिंदूसरा नदीपात्र परीसरात फेरफटका मारल्यास परीसरातील तुंबलेल्या नाल्या , साचलेल्या कचरा व कोंडलेल्या नाल्या दिसतील पुढील अनर्थ टाळण्यासाठी नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाने तत्परतेने बीड शहरातील नाल्यांची सफाई करून घ्यावी अशी मागणी बीड शहरातील जनतेतून होत आहे .








