एकनाथ शिंदेंनासाठी मी काय कमी केलं उद्धव ठाकरे भावनिक!

Beed

एकनाथ शिंदेंनासाठी मी काय कमी केलं उद्धव ठाकरे भावनिक!

मुंबई/वृत्तसेवा 

राजकारण महाराष्ट्रात ज्यास्त पेटला असुन एकनाथ शिंदे आपल्या मागणीवर ठाम आहेत तर आज उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी राज्यातील शिवसेना जिल्हाप्रमुखांशी ऑनलाईन माध्यमातून संवाद साधला यावेळी साधलेल्या संवादात बोलले की अनेकदा मनधरणी करूनही माघार घ्यायला तयार नसलेल्या बंडखोर आमदारांवर शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अक्षरश: आगपाखड केली. 'आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय', असं तुणतुणं कायम वाजवणाऱ्या शिवसेना आमदारांचा उद्धव ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला. आधी बाळासाहेब विठ्ठल आणि आम्ही बडवे, आता मी विठ्ठल आणि इतर बडवे हीच गोष्ट उद्या आदित्यसोबतही घडणार नाही का? आदित्यला बडवे म्हणायचं आणि स्वत:चा मुलगा खासदार हे कसं चालतं, असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले. तुम्हाला तुमच्या मुलाला मोठं करावसं वाटतं मग मला वाटणार नाही का, असा सवालही मुख्यमंत्र्यांनी विचारला. उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी राज्यातील शिवसेना जिल्हाप्रमुखांशी ऑनलाईन माध्यमातून संवाद साधला.यावेळी उद्धव ठाकरे यांचा रौद्रावतार दिसून आला. त्यांनी म्हटले की, सेनेच्या अस्तित्वावर बोलणाऱ्यांना निष्ठा काय असते दाखवावी लागेल. मला या सगळ्या गोष्टीचा वीट आला आहे. पण ही वीट आता मी डोक्यात हाणणार आहे, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

 

एकनाथ शिंदेंसाठी काय कमी केलं?

"एकनाथ शिंदे यांच्यासाठी मी काय कमी केलं? नगर विकास खातं दिलं. माझ्याकडची दोन खाती दिली" असा सवाल यावेळी ठाकरेंनी विचारला. सत्ता आल्यानंतर आधी कोव्हिडचं विचित्र लचांड गेल्या दोन वर्षांपासून मागे लागलं आहे. कोव्हिड संपतो तर मानेचा त्रास सुरु झाला आणि आता हा त्रास. कोण कोणत्या वेळी कसं वागेल हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. मी त्या दिवशी मनातलं सगळं सांगितलं, आजही मन मोकळं करतो. माझ्या मानेवर शस्त्रक्रिया गरजेची होती. मोदीही म्हणाले होते, ऑपरेशन हे हिंमतीचं काम आहे, पण हिंमत माझ्या रक्तातच आहे. पहिल्या ऑपरेशनच्या वेळी सगळं ठीक होतं, मग शरीराला त्रास होऊ लागला. शरीराचे काही भाग बंद पडत होते, म्हणून दुसरं ऑपरेशन केलं. त्याचा फायदा घेत विरोधकांनी डाव साधण्याचा प्रयत्न केला, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Sharing

Visitor Counter