अल्पसंख्याक समुहातील विद्यार्थ्यांना इंजिनिअर होण्याची सुवर्णसंधी, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा -सुफियान मनियार

Beed

अल्पसंख्याक समुहातील विद्यार्थ्यांना इंजिनिअर होण्याची सुवर्णसंधी, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा -सुफियान मनियार

बीड/प्रतिनिधी

राज्यातील 14 शासकीय तंत्रनिकेतनमध्ये (पॉलिटेक्निक कॉलेज) मध्ये अल्पसंख्याक समुहातील विद्यार्थ्यांसाठी विशेष तुकडी सुरु करण्यात आली असुन वार्षिक फक्त रू. ७७५०/- इतक्या अत्यल्प शुल्कामध्ये प्रवेशाची संधी उपलबध करण्यात आली आहे, अल्पसंख्यांक विशेषतः मुस्लिम समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन लोकसेना संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुफियान मनियार यांनी केले आहे.

धार्मिक अल्पसंख्याक समुहातील १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना राज्य शासनामार्फत हिंगोली, अंबड, जालना, लातूर, नांदेड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी, ठाणे, चंद्रपूर, जळगांव, पुणे, कराड, सोलापूर येथील १४ शासकीय तंत्रनिकेतनमध्ये (पॉलिटेक्निक) मेकॅनिकल, सिव्हिल, कॉम्प्युटर, आयटी अशा विविध कोर्सेस साठी अल्पसंख्याकांसाठी विशेष तुकडी सुरु करण्यात आली आहे. •वार्षिक फक्त रू. ७७५०/- इतक्या अत्यल्प शुल्कामध्ये प्रवेशाची संधी असून यासोबतच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचीही संधी मिळणार आहे त्यासाठी केंद्र शासनाच्या शिष्यवृत्तीसाठी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा रु.२.०० लाखापर्यंत तर राज्य शासनाच्या शिष्यवृत्तीसाठी रु. ८.०० लाखापर्यंत असणे गरजेचे आहे.विशेष तुकड्यांमध्ये अल्पसंख्याकांसाठी १,१५५ जागा उपलब्ध राहणार आहेत तसेच मुलींसाठी ३० टक्के जागा राखीव आहे, याशिवाय नियमित तंत्रनिकेतनामध्येही प्रवेशाचा हक्क राहणार आहेत. प्रवेशासाठी Online नोंदणी दि. ३० जून २०२२ पर्यंत आहे लवकरात लवकर नोंदणीसाठी करावे. अधिक माहितीसाठी संकेतस्थळ https://poly22.dte.maharashtra.gov.in वर भेट द्यावे असे आवाहन लोकसेना संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुफियान मनियार यांनी केले आहे.

Sharing

Visitor Counter