थोडा पाऊस झाला की बीडचे, गटारबीड आणि चिखलबीड होते

थोडा पाऊस झाला की बीडचे, गटारबीड आणि चिखलबीड होते
बीडकरांनो शिवसंग्रामला एक हाती सत्ता द्या
बीड/वार्ताहर
विकासाच्या नावाखाली बीड शहराचे चिखलबीड व गटारबीड झालं तरीसुद्धा बीडकरांचे डोळे उघडत नसतील तर हे आपलेच दुर्दैव समजावे लागेल. यापुर्वीच्या सत्तेतील गुलाम नगरसेवकांनी बीडची जनता गुलाम केली व स्वतःच्या स्वार्थासाठी चाळीस - चाळीस वर्ष एकाच दावणीला बांधुन जनतेला वेठीस धरले
बीड शहरामध्ये आज थोडासा पाऊस झाला असताना पूर्ण नाल्याचं पाणी रस्त्यावर आलं. बीड शहरातील जालना रोड हा प्रमुख मार्ग असुन सुद्धा या नाल्याचे पाणी पूर्ण रोड वरून वाहत होतं . मोटारसायकली, महिला -भगिनी व विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडता येत नव्हता.जर प्रमुख रस्त्यावर असे हाल होत असतील तर बीड शहरातील छोट्या - छोट्या गल्ल्यांमध्ये थोडा पाऊस झाला तरी पाणी लोकांच्या घरांमध्ये शिरते याला संपूर्ण जबाबदार बीडचे मागील सत्ताधारी हेच आहेत. चाळीस वर्षे फक्त सत्ता भोगली कोणताही विकास केला नाही . नगरपालिकेने तर दिल्लीहून "स्वच्छ शहर , सुंदर शहर " हे प्रमाणपत्र मिळवले तसेच राष्ट्रीय पारितोषिकही पटकावलं, परंतु खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर बीडमध्ये कोणत्याच नागरी सुविधा मिळत नाहीत हे हि तितकच खरे आहे .
नगरपालिकेचे कर्मचारी स्वतःचे कामकाज पूर्ण करत नाहीत. नगरपालिकेचे अधिकारी भ्रष्टाचारात तल्लीन आहेत,आ. विनायकराव मेटे यांनी भ्रष्टाचारी अधिकारी डॉ.उत्कर्ष गुट्टे व त्यांचे पाच सहकारी यांना सस्पेंड केले . जर अधिकारी भ्रष्ट असतील तर त्यांचे कर्मचारीही त्यांचेच अनुकरण करत असतात स्वतःहून कोणीही काम करत नाही कोणाचा - कोणावर कसलाही अंकुश राहिलेला नाही . सर्व काही आलबेल होत आहे म्हणून बीडकरांनी खऱ्या अर्थाने सदसद विवेक बुद्धीचा वापर करून शिवसंग्रामला संधी द्यावी यानिमित्ताने विकासाची गंगा आ.विनायकराव मेटे यांच्या माध्यमातून बीड शहरामध्ये निश्चितपणे आणली जाईल. पिण्याचा पाण्याचा प्रश्न , वीज, रस्ते याबाबत मूलभूत प्रश्नाबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शिवसंग्राम प्रयत्नाची पराकाष्टा करेल यात तिळमात्र शंका नाही . जेव्हा माणूस आजारी असतो आणि आजार बरा होत नसतो त्यावेळेस दवाखाना बदलून पहावा लागतो, डॉक्टर बदलून पहावा लागतो, औषधे बदलून पाहावे लागतात म्हणून जर शहराचा कायापालट करायचा असेल त्यावेळेस सत्ताबदल होणे गरजेचे आहे आणि आगामी नगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून बीडकर एक मताने बीड नगरपालिका शिवसंग्रामच्या ताब्यात देतील व बीडकरांची सेवा करण्याची संधी द्यावी असे बीड करांना शिवसंग्रामच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे .
