इम्तियाज़ जलील यांच्यावर भाष्य करण्याची यांची लायकी नाही! - शिवाजी भोसकर

Beed

इम्तियाज़ जलील यांच्यावर भाष्य करण्याची यांची लायकी नाही! - शिवाजी भोसकर

नुपुर शर्मा, नवीन जिंदल हे पैगंबरांविषयी बरळले असता सलीम जहांँगीर झोपले होते का ?

बीड/प्रतिनिधी

एआयएमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा औरंगाबाद जिल्ह्याचे खासदार इम्तियाज़ जलील यांनी राज्याच्या लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांना दिलेल्या सल्ल्यावर बीड शहरातील भाजप कार्यकर्ते सलीम जहाँगीर यांनी प्रसिद्धी माध्यमातून पत्रक काढत तोंडसुख घेत पक्षात स्वतःची पत वाढविण्याच्या केलेल्या प्रयत्नावर एआयएमआयएम पक्षाचे बीड शहराध्यक्ष शिवाजीराव भोसकर यांनी खरपूस समाचार घेत याविषयी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, इम्तियाज़ जलील यांच्यावर भाष्य करण्याची त्यांची लायकी नाही तर ज्यावेळी नुपुर शर्मा व नवीन जिंदल सारखे बोलके बाहूले पैगंबरांविषयी बरळले असता सलीम जहांँगीर झोपले होते का ? असा प्रश्नही उपस्थित केला आहे.

याविषयी पत्रकात नमूद केले आहे की, इस्लाम धर्मात अल्लाह नंतर सर्वोच्च स्थान असलेल्या मुहम्मद पैगंबरांविषयी प्रत्येक खऱ्या मुस्लिमाला स्वतःच्या जिवापेक्षा जास्त महत्त्व आहे. गुस्ताख़ ए रसूल चा शिरच्छेद करण्याचे फर्मान इस्लाम धर्मात आहे. असे असतानाही भाजपची बोलकी बाहुली असलेली नुपुर शर्मा व नवीन जिंदल सारख्या ठोकळ्यांनी मुहम्मद पैगंबरांविषयी अर्वाच्च भाषेत स्वतःच्या नसलेल्या अकलेचे तारे तोडले. तेव्हा खरेतर सलीम जहांँगीर सारख्या हाताच्या बोटावर मोजता येण्यासारखे भाजप मध्ये कार्यरत असलेले फक्त जन्माने मुस्लिम असलेले परंतु तन-मनाने इस्लाम विरुद्ध जाऊन संघ व भाजपच्या विचारसरणीत रमून गेलेल्या मुस्लिम पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्यात मुहम्मद पैगंबर व इस्लाम धर्माबद्दल थोडी जरी आस्था शिल्लक असती तर या सर्वांनी आपापल्या पदाचे राजीनामे व कार्यकर्ते पद संघ व भाजपच्या नेतेमंडळींच्या तोंडावर फेकून मारले असते. परंतु तेव्हा मूग गिळून गप्प बसणारी ही मंडळी आमचे प्रदेशाध्यक्ष व खासदारांनी पंकजाताई सारख्या लोकनेत्यावर पक्षात होत असलेल्या अन्यायाबाबत मोठ्या भावासारखा सल्ला देऊन उदाहरणासह आरसा दाखवत म्हटले होते की, आता प्रत्येक समाजातील नेते हे त्यांच्या-त्यांच्या समाजातील जनतेचे प्रतिनिधित्व करीत आहेत. 

माळी, धनगर, दलित, मराठा, शेतकरी अशा वेगवेगळ्या समाजाचे नेतृत्व वेगवेगळे नेते करीत आहेत हे चटकन लक्षात येते. 

याप्रमाणे वंजारी समाजासाठी आता पुढे येऊन पंकजाताईंनीही नेतृत्व स्वीकारावे. ज्यामुळे त्या वंजारी समाजाच्या नेत्या म्हणून फक्त राज्यातच नाहीतर देशातही लोकप्रिय होतील. ज्यामुळे फक्त भाजपच नाही तर प्रत्येक पक्षाला त्यांच्या नेतृत्वाची दखल घ्यावीच लागेल.

वास्तविक पाहता हा सल्ला पंकजाताई यांच्या फायद्याचाच आहे. परंतु कट्टर हिंदूत्ववादी संघ आणि भाजपच्या ओंजळीने पाणी पिणाऱ्या सलीम जहांँगीर सारख्यांच्या पोटात या सल्ल्याने कळ निघाली आणि त्यांनी इम्तियाज़ जलील सारख्या उच्चशिक्षित व अभ्यासू नेतृत्वाविषयी आपल्या तोंडाची टिमकी प्रसिद्धी माध्यमातून पत्रक काढून वाजविली. 

इम्तियाज़ जलील यांना दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्यामुळे मुंडे कुटूंबियांविषयी आस्था आहे. म्हणूनच त्यांनी मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळख असलेल्या औरंगाबाद शहरात गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाने मोठे रुग्णालय उभारून रुग्णालयाच्या परिसरात त्यांचा भव्य पुतळा लावावा अशी मागणी राज्य सरकारकडे केली होती. अशी दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाविषयी भाष्य करण्याची सलीम जहाँगीर यांची लायकी नाही. असे सडेतोड व झणझणीत मत एआयएमआयएम पक्षाचे बीड शहराध्यक्ष शिवाजीराव भोसकर यांनी दिलेल्या पत्रकातून व्यक्त केले आहे.

Sharing

Visitor Counter