नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ॲड. शेख शफीक भाऊंचे गेवराई, माजलगाव, धारूर तालुक्यात झंझावती दौरे

Beed

नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ॲड. शेख शफीक भाऊंचे गेवराई, माजलगाव, धारूर तालुक्यात झंझावती दौरे

बीड/प्रतिनिधी

 आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एआयएमआयएम पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफीक भाऊ यांनी गेवराई, माजलगाव आणि धारूर तालुक्यात झंझावाती दौरा केला. यावेळी स्थानिक पदाधिकाऱ्यांसह पक्षाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दौऱ्यादरम्यान घेतलेल्या छोटेखानी सभांमध्ये गेवराई येथे बोलताना शफिक भाऊ म्हणाले की, पवार आणि पंडित या डबल पी-पी मुळे गेवराई तालुक्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. ज्यामुळे त्यांच्या जवळील बगलबच्च्यांना सोडले तर इतर सर्वसामान्य जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पी-पी कडून जनतेला मुक्त करण्यासाठी एआयएमआयएम कडून सक्षम पर्याय देणे आपले कर्तव्य आहे. 

माजलगाव तालुक्यात फक्त स्वतःचे वजन वाढवून तालुक्याचे वजन हलके करणाऱ्या सोळंके यांची एकाधिकारशाही संपुष्टात आणायची आहे. 

धारूर तालुक्यात भाजपचे डॉक्टर हजारी यांच्या मनमानीला ही आळा घालायचा आहे. 

याकरिता पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह प्रत्येक कार्यकर्त्यांनी झोकून देऊन कामाला लागावे. बीड जिल्ह्यातील प्रत्येक नगर परिषदेमध्ये आपल्या पक्षाला घवघवीत यश मिळवायचे आहे. याकरिता जिल्हा पातळीवरील नेतृत्वासह प्रत्येक तालुक्यातील नेतृत्वाने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह झोकून देऊन कामाला लागावे. प्रत्येकाने आपापली भूमिका व कार्य योग्य आणि चांगल्या पद्धतीने करावे असे म्हटले.

यावेळी गेवराई येथे एजाज़ सय्यद सर तालुकाध्यक्ष,

साहिल शेख तालुका उपाध्यक्ष, हाफेज नवीद साहब युवक तालुकाध्यक्ष, फेरोज शेख युवक शहराध्यक्ष, शाकेर शेख  तालुका सचिव, अझहर जहागीरदार, युनूस मामु तालुका प्रवक्ते, शाकेर सय्यद शहर सचिव, मोहम्मद शेख, आसेफ कुरैशी, रिजवान शेख, अमजद पठाण, तालेब कुरैशी, रफिक कुरैशी, अल्तमश बागवान, सलमान शेख, समीर पठाण, अकबर शेख, तालेब पठाण, सलीम सय्यद, जुबेर शेख, मुबीन शेख. 

माजलगाव येथे इद्रीस शेख तालूकाध्यक्ष, शेख रशिद शहराध्यक्ष, हाफेज मोहसीन तालुका सचिव, गुड्डू खतिब शहर संघटक, नाजेर कुरैशी ओबीसी तालुकाध्यक्ष, नावेद सिद्दिकी युवा नेते, हाफेज फारुख तालुका प्रवक्ता, हाफेज फारुख, सिध्दिक खान, सोहेल अत्तार युवा शहराध्यक्ष, शमशेर पठाण युवक तालुकाध्यक्ष, अन्सर शेख उपतालुकाध्यक्ष, मजहर शेख, फारूक भाई, अखिल शेख शहर सचिव व अन्य कार्यकर्ते. 

धारूर येथे अफरोज पठाण  तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष मुबीन साहब, उपाध्यक्ष  फारुख जरगर, सोशल मीडिया सय्यद शाहरुख,    सोशल मीडिया शेख सईद, मोहसीन इनामदार, अय्युब शेख, फारूक पठाण, सुनील गायसमुद्रे, महेश शिरसाठ, कलीम शेख, सोफियान, जिशान, तंबोली शोएब, सोहेल शाह, सर्फराज.

बीडहून शफीक भाऊंसोबत 

शेख एजाज खन्ना भैय्या जिल्हा उपाध्यक्ष तथा बीड तालुका अध्यक्ष, अन्वर पाशा साहब जिल्हा सहसचिव, शेख शाकेर भाई बीड शहर उपाध्यक्ष, हाफेज नवीद साहब युवक तालुकाध्यक्ष गेवराई, लियाकत बेग  गेवराई तालुका सचिव, शाहनवाज खान बीड शायर, सफी दादा युवा नेते यांची प्रमुख उपस्थिती होती.

Sharing

Visitor Counter